नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुलांना शिकवितांना शिक्षक तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट,पान तर कधी मद्याचेही सेवन करतात. त्यामुळे विद्यार्थी वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी पुढाकार घेत मद्यपी शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव जि.प. शिक्षण विभागाच्या विषय समितीच्या सभेत पारित केला आहे.विद्यार्थी वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याचे लक्षात येताच शिक्षण विभागाने व्यसनाधीन शिक्षकांची शोध मोहीम राबविण्याचे निर्देश २०१५ मध्ये दिले होते. यासंदर्भात १८ डिसेंबर २०१५ ला गोंदिया जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यातील व्यसनाधीन शिक्षकांवर बडतर्फ करण्याची कारवाई करण्याचे प्रस्ताव मागविले होते. परंतु तीन वर्षापासून यावर अमंलबजावणी झाली नाही. तीन वर्षानंतर जि.प. शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी पुढाकार घेऊन मद्यपी शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या विषय समितीच्या सभेत पारीत करवून घेतला. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता वाढत आहे. ५ ते २० वयोगटातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात व्यसनाधिन असल्याचे महाराष्टÑ सरकारने मान्य केले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोरच व्यसन करीत असल्याने विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जात आहे. असे गृहीत धरून व्यसनाधिन शिक्षकांना व्यसनमुक्त करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी आधी व्यसनाधिन असलेल्या शिक्षकांची यादी तयार करा, त्यांना व्यसनमुक्त होण्याचा सल्ला द्या, व्यसनमुक्त शिक्षक होण्यासाठी त्यांच्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करा असे सूचविले. वारंवार मार्गदर्शन करूनही व्यसन न सोडणाºया शिक्षकांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न देता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. यासंबधी शिक्षण सहसंचालकांनी संपूर्ण राज्यभरातील व्यसनाधीन शिक्षकांची माहिती मागविली होती. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांना पत्र पाठवून व्यसनाधिन असलेल्या शिक्षकांची माहिती शासनाने मागविली होती. परंतु किती शिक्षक व्यसनाधिन आहेत याची माहिती जि.प.च्या शिक्षण विभागाला मिळाली नव्हती. त्यानंतर हा विषय थंडबस्त्यात राहीला. आता पुन्हा शिक्षण सभापतीने जि.प.च्या सभेतच ठराव पारीत करून प्रत्येक तालुक्यातून किमान एका तरी शिक्षकावर कारवाई व्हावी असा आग्रह धरून सर्व गटशिक्षणाधिकाºयांनी तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या आहे.आदेश बडतर्फ करण्याचे, मात्र केले निलंबितजे शिक्षक तंबाखू, खर्रा, दारू, बिडी, सिगारेटचे सेवन करतात अश्या शिक्षकांसंबधात कठोर निर्णय घेत त्यांना पदोन्नती न देणे, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार न देणे, त्यांना शासनाच्या सोयीसुविधा पासून वंचीत करणे, ज्या शिक्षकांना व्यसनमुक्त राहण्याचे मार्गदर्शन केल्यानंतरही ते ऐकत नसतील अश्या शिक्षकांवर सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील चार मद्यपी शिक्षकांना बडतर्फ न करता निलंबित करण्यात आले.चौघांची एक वेतनवाढ थांबविलीमद्यप्राशन करून शाळेत येणाºया गोंदिया जिल्ह्यातील चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील वरीष्ट प्राथमिक शाळा ईसापूर येथील आर.जी. फुलबांधे, भरनोली येथील डी.एम. लाणारे, देवरी तालुक्यातील खांबतलाव येथील जि.प. शाळेतील जी.आर.मरस्कोल्हे व आमगाव तालुक्याच्या भोसा जि.प. शाळेतील एक शिक्षक अश्या चार शिक्षकांना निलंबित करून त्यांची एक वेतनवाढ थांबविली आहे.मद्यपी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. शाळेचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक तरी मद्यपी शिक्षकावर कारवाई करण्याचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकाºयांनी जि.प.ला पाठवावा तरच कारवाईच्या धास्तीपोटी शिक्षकांची शाळेतील व्यसनाधीनता कमी होईल.-रमेश अंबुलेशिक्षण सभापती जि.प.गोंदिया.
जि.प.चे टार्गेट आता व्यसनाधीन शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 10:20 PM
मुलांना शिकवितांना शिक्षक तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट,पान तर कधी मद्याचेही सेवन करतात. त्यामुळे विद्यार्थी वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी पुढाकार घेत मद्यपी शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव जि.प. शिक्षण विभागाच्या विषय समितीच्या सभेत पारित केला आहे.
ठळक मुद्देजि.प.ची अमंलबजावणी: विद्यार्थ्यांना व्यसनापासून रोखण्यासाठी खटाटोप