शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

 १० रूपयांच्या लवंगानं सांधेदुखीसह कॅन्सरसाख्या गंभीर आजारांपासून राहाल लांब, वाचा इतर फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 3:40 PM

Health Tips in Marathi : अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार लवंग लिव्हर आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं.

दिसायला अगदी लहानशी असणारी लवंग खूप गुणकारी असते. लवंगात अनेक औषधी गुणधर्म असतात. लवंग खाल्यानंतर शरीरात उष्णता तयार होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांमध्ये लवंगाचा वापर केला जातो. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार लवंग लिव्हर आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. आज आम्ही तुम्हाला लवंगाच्या औषधी गुणधर्माबद्दल सांगणार आहोत. हेल्थ लाईन या वेबसाईडवर लवंगाच्या फादयांबाबत अधिक माहिती दिली आहे.

लवंगातील पोषक तत्व

लवंगात व्हिटामीन , फायबर्स आणि इतर शरीराला पोषक असणारी खनिजं असतात. म्हणून आरोग्य तज्ज्ञ लवंगाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. एक चमचा लवंगात ६ कॅलरीज असतात. मेंदूला चालना देण्यासाठी तसंच योग्य पद्धतीनं काम करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.  लवंगात अनेक एंटी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आजारांना रोखण्यास मदतहोतो. विशेष म्हणजे ताण तणाव कमी प्रमाणात येतो. लवंगात न्यूजेनॉल नावाचा एक पदार्थ असतो जो एंटीऑक्सिडेंट्सच्या स्वरूपात कार्य करतो.  यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

कॅन्सरपासून होतो बचाव

अभ्यासानुसार लवंगात अशी अनेक तत्व असतात. ज्यामुळे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत होते. कॅन्सरमधील ट्यूमर वाढण्यापासून रोखता येतं. लवंगातील युजेनॉलमध्ये एंटी कॅन्सर गुणधर्म असतात.

बॅक्टेरिया नष्ट होतात

लवंगात अनेक मायक्रोबायल  गुण असतात. ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखण्यास मदत होते. लंवगाचे तेल फूड पॉईंजनिंग  निर्माण करत असलेल्या बॅक्टेरियांची लढण्यासाठी फायदेशीर ठरते. लवंगातील एंटीबॅक्टेरिअल गुण दातांसाठीही फायदेशीर असतात. यामुळे हिरड्यांमधील किटाणू मरण्यास मदत होते. 

पचनक्रीया सुधारते

लवंगाच्या सेवनाने शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर पोटाच्या अनेक तक्रारी जसे गॅस, जळजळ, अपचन आणि उलट्या होणे यांसारख्या तक्रारींवर गुणकारी असते. तसेच लवंगाच्या सेवनाने अॅसिडिटीवरही आराम मिळतो.  ओव्हेरियन कॅन्सरचं कारण ठरू शकतं वजन वाढणं; महिलांनी 'या' लक्षणांकडे वेळीच द्यायला हवं लक्ष

दातदुखीवर फायदेशीर

दातदुखीवरही लवंग अत्यंत परिणामकारक ठरते. जर तुम्ही दातदुखीने त्रस्त आहात तर एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर लंवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या दातावर लावा. आराम मिळेल.चिंताजनक! या देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार; आरोग्यमंत्र्याचा धोक्याचा इशारा

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत

बोलताना समोरच्याला आपल्या तोंडाचा दुर्गंध येतो. त्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर ठरते. लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंधी दूर होतो आणि फ्रेश वाटते. Brushing Tips: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? मग वेळीच जाणून घ्या योग्य पद्धत, दुर्गंधीसुद्धा होईल दूर

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्नHeart Diseaseहृदयरोग