१५ मिनिट टीव्ही पाहणे मुलांसाठी धोकेदायक !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 7:39 PM
काही तज्ज्ञांनी टीव्हीला ‘इडियट बॉक्स’ म्हटले आहे आणि तेही काही चुकीचे नाही.
काही तज्ज्ञांनी टीव्हीला ‘इडियट बॉक्स’ म्हटले आहे आणि तेही काही चुकीचे नाही. एका अभ्यासानुसार, लहान मुलांनी टीव्ही पाहिल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास मंदावतो, तसेच त्याच्यातील सृजनशीलतादेखील कमी होते. तसेच १५ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्हीवर कार्टून पाहणाºया मुलांच्या कल्पनाशक्तीवरही मोठा परिणाम होतो. शिवाय, सृजनशीलता संपण्याची भीती असते असे निदर्शनास आले आहे. ब्रिटनमधील स्टेफोर्डशायर विद्यापीठाने तीन वर्षांच्या ६० विद्यार्थ्यांचे निरीक्षण केल्यानंतर याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. स्टॅफोर्डशायर विद्यापीठाचे प्रवक्ते सराह रोझ यांनी याबाबत सांगितले की, १५ मिनिटं किंवा त्यापेक्षा अधिक वेळ टीव्ही पाहिल्याने काही काळानंतर सृजनशीलता संपण्याची सुरुवात होते. पुढे जाऊन मुलांच्या बौद्धिक विकासावरही त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.लहान मुलांसाठी टेलिव्हिजन शो बनवणाºयांना आणि पालकांसाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. त्यादृष्टीने टीव्ही शोच्या निर्मात्यांनी आणि पालकांनी आपली पावलं उचलण्याची गरजही आहे. बेलफास्टमध्ये ब्रिटिश सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट कॉन्फरन्समध्ये हा अभ्यास सादर करण्यात आला.