कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी जगभरातील लोक लस आणि औषधांची प्रतिक्षा करत आहे. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत घरगुती उपाय करून कोरोनाला स्वतःपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर यासोबत कोरोनाकाळात संक्रमणापासून वाचण्यासाठी लोक घातक पाऊलं उचलत आहेत. ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकेतील अनेकांनी खाद्यपदार्थांमध्ये चक्क ब्लीच मिसळल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. अमेरिकेतील आरोग्य संस्था सीडीसीकडून ५०० पेक्षा जास्त लोकांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्वेतील रिपोर्ट वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. घर साफ करण्यासाठी वापरात असलेल्या क्लिंजरने लोक अवयवांनासुद्धा स्वच्छ करत आहेत. ३९ टक्के लोकांनी मान्य केले की, त्यांनी कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याासाठी साफ-सफाईच्या वस्तूंचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे.
कोरोनापासून बचावासाठी चुकीच्या उत्पादनांचा वापर केल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडून आला आहे. कोरोनाकाळात लोकांमध्ये झालेल्या बदलावरून WHO ने धोक्याची सुचना दिली आहे. सॅनिटायजर, ब्लीचचा वापर साफ सफाई करताना काळजीपूर्वक करायला हवा. या उत्पादनांच्या वापराबाबत केलेली चूक घातक ठरू शकते.
या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या १८ टक्के लोकांनी त्वचेवर घरगुती क्लिनर वापरत असल्याचे मान्य केले. तर १० टक्के वयस्कर लोकांनी स्वतःवर जंतूनाशक शिंपडत असल्याचे मान्य केले आहे. ६ टक्के लोकांनी क्लिनरचे सेवन करत असल्याचे मान्य केले. तर ४ टक्के लोकांनी दारूच्या नशेत साबणाचं पाणी आणि ब्लीच, किटाणूनाशक द्रव्य पाण्यात मिसळून प्यायल्याचे सांगितले.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणात भारतातही अनेक सॅनिटायजर पिण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शरीरातील संक्रमण कमी करण्याच्या नादात लोकांनी चुकीचं आणि जीवघेणं हे पाऊल उचललं आहे. आईसीएमआरने ब्लीच, सॅनिटायजर किंवा क्लिनरचा वापर शरीरावर न करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.
काळजी वाढली! कोरोना विषाणू कोणत्या भागावर कितीवेळ जिवंत राहू शकतो?;संशोधनातून खुलासा