काही लोकांना जेवण करताच टॉयलेटला जाण्याची सवय असते. एक्सपर्ट्सनुसार हे लक्षण दर्शवतं की, या लोकांचं डायजेशन खराब आहे. पण जेवणानंतर लगेच टॉयलेटला जाणं फायदेशीर असू शकतं. ही माहिती आयुर्वेदिक डॉक्टर वैद्य मिहिर खत्री यांनी दिली आहे.
एक्सपर्ट्सनुसार, जेवण केल्यानंतर लगेच लघवीला जाणे आणि डाव्या बाजूने झोपल्यावर गावात वैद्य असण्याची गरज नाही. आयुर्वेदिक चिकित्सकांनी सांगितलं की, जेवण केल्यानंतर ही दोन कामे केल्यावर शरीर जास्त काळ हेल्दी राहणार.
जेवणानंतर लगेच लघवी करण्याचे फायदे
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हाही तुम्ही जेवण कराल त्यानंतर लगेच लघवी करा. याने किडनी निरोगी राहील आणि यासंबंधी समस्याही होणार नाहीत. ही सवय तुमच्या हृदयासाठीही फायदेशीर ठरू शकते. हृदयासंबंधी अनेक धोके यामुळे कमी होऊ शकतात.
डाव्या बाजूने झोपण्याचे फायदे
डाव्या बाजूने झोपण्याला वाम कुक्षी म्हटलं जातं. आयुर्वेदात जेवण केल्यानंतर याच बाजूने झोपण्यास सांगितलं आहे. असं केल्याने अन्न चांगलं पचतं आणि पोटाच्या समस्याही होत नाहीत. त्यामुळे ही सवय नक्की लावा.
डाव्या बाजूने झोपण्याचे फायदे
आयुर्वेदिक चिकित्सकाशिवाय अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, डाव्या बाजूने झोपल्याने हार्टबर्नची समस्या कमी होते. या पोजिशनमध्ये अन्न सहजपणे आतड्यांमधून जातं आणि डायजेस्टिव डिसऑर्डरची समस्या होत नाही.
जेवणानंतर करू नका या चुका
- जेवणानंतर लगेच करू नका एक्सरसाइज
- कॅफीनचं सेवन करू नका
- जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका
- दातांची स्वच्छता टाळू नका
- जेवणानंतर लगेच आंघोळ करू नका