वातावरणांमध्ये बदल झाला की, डासांचा त्रास सुरू होतो. दमट किंवा उष्ण वातावरण हे डासांसाठी फारच पोषक असतं. डास वाढले तर रात्रीची झोप तर खराब होतेच, सोबतच अनेक गंभीर आजारांचा देखील सामना करावा लागतो. अशात घरातील डास पळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण तरीही डास काही घरातून जात नाहीत. तुम्हीही डास पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय थकले असाल तर आज आम्ही तुम्हाला डास पळवण्याचे दोन सोपे उपाय सांगणार आहोत. तसेच हेही सांगणार आहोत की, डास तुम्हालाच का चावतात.
कार्बन डायऑक्साइड
जेव्हा तुम्ही घेता आणि सोडता तेव्हा कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतं. जे डासांना आकर्षित करतं. जे लोक जास्त शारीरिक हालचाल करतात किंवा ज्यांची श्वास घेण्याची पद्धत जरा वेगळी आहे, त्यांना डास जास्त चावतात.
लॅक्टिक अॅसिड
जेव्हा आपण व्यायाम करतोत तेव्हा आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक अॅसिड तयार होतं. डास याच्या वासाकडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळे ते तुम्हाला जास्त चावतात.
शरीराचं तापमान
डास गरम रक्त असलेल्या जीवांकडे आकर्षित होतात. ज्या लोकांच्या शरीराचं तापमान जरा अधिक असतं, त्यांना डास जास्त चावतात.
त्वचेतील बॅक्टेरिया
आपल्या त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. ज्यांकडे डास जास्त आकर्षित होतात. अशात आपली त्वचा स्वच्छ ठेवणं नेहमी फायदेशीर ठरतं.
रक्ताचा गट
काही लोकांच्या रक्ताचा प्रकार असा असतो जो डासांना जास्त आवडतो. गर्द रंगाचे कपडे डासांना जास्त आकर्षित करतात.
लिंबू आणि लवंग
लिंबाचे दोन तुकडे करून त्यात काही लवंग खोचा. हे लिंबू घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा. लवंगाच्या गर्द वासामुळे डास दूर पळतात. तसेच तुळशीचं झाड घरात लावल्याने देखील डास दूर पळततात.
लसूण आणि कडूलिंबाची पाने
लसणाच्या कळ्या बारीक करून पाण्यात मिक्स करा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून घरात स्प्रे करा. लसणाच्या वासाने डास दूर पळतात. तसेच कडूलिंबाची पाने जाळल्यावर होणाऱ्या धुरामुळेही डास घरातून पळून जातात.