किडनी स्टोनची (Kidney Stone Case) समस्या किती भयावह असते ही त्यांना चांगलंच माहीत आहे ज्यांना ही समस्या झालीये. किडनी स्टोनबाबत हैद्राबादमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका रूग्णाच्या किडनीमधून इतके स्टोन काढण्यात आले ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. इथे डॉक्टरांच्या टीमने ५४ वर्षीय रूग्णांच्या सर्जरीनंतर २०६ किडनी स्टोन काढले. एका तासाच्या सर्जरीनंतर डॉक्टरांना हे किडनी स्टोन काढण्यात यश मिळालं.
तेलंगणातील अवेअर ग्लेनईगल ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नालगोन्डमध्ये राहणाऱ्या वीरामल्ला रामालक्ष्मइयाच्या किडनीतून २०६ स्टोन कीहोल सर्जरीच्या माध्यमातून काढले. रिपोर्टनुसार, रूग्ण एका डॉक्टरकडून औषध घेत होता जी खाऊन त्याला काही वेळासाठी वेदनांपासून सुटका मिळत होती. हळूहळू वेदना वाढत गेल्या आणि नंतर अशी स्थिती निर्माण झाली की, त्याला काम करणंही अवघड झालं.
हॉस्पिटलचे सीनिअर डॉक्टर पूला नवीन कुमार म्हणाले की, 'सुरूवातीच्या चेकअपवरून आणि अल्ट्रासाऊंड स्कॅनवरून समजलं की, व्यक्ती किडनीत डावीकडे स्टोन आहेत. सीटी कब स्कॅनमध्ये आल्यानंतर किडनीमध्ये स्टोन असल्याचं कन्फर्म झालं. यानंतर डॉक्टरांनी रूग्णाची काउन्सेलिंग केली आणि त्याला एक तासाच्या सर्जरीसाठी तयार केलं. या सर्जरीमध्ये सर्व किडनी स्टोन यशस्वीपणे काढण्यात आलेत.
रूग्ण वीरामल्ला रामालक्ष्मइया सर्जरीनंतर आता पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. डॉ. पूला नवीन कुमार म्हणाले की, रूग्णाच्या सर्जरीच्या दुसऱ्या दिवशीच डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं की, उन्हाळ्यात हाय टेंपरेचरमुळे लोकांमध्ये डिहायड्रेशनच्या केसेस वाढत आहेत. अशात लोकांना बॉडी हायड्रेड ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
डॉक्टरांनी सांगितलं की, उन्हाळ्यात लोकांनी भरपूर पाणी प्यायला हवं. नारळ पाण्यानेही शरीर हायड्रेट ठेवलं जाऊ शकतं. या काळात तुम्ही शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड, ताक, लस्सी किंवा काकडीचं सेवन करू शकता.