मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. मेडिटेशन ही नक्कीच साधी आणि एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो. श्रेयांस डागा फाऊंडेशन या संस्थेनं सर्वांसाठी अशीच एक मोफत संधी आणली आहे.
श्रेयांस डागा फाऊंडेशन ही एक नॉन प्रॉफिट संस्था असून गायडेड मेडिटेशन, अभ्यासक्रम आणि साहित्य यांचे सर्वात मोठे आणि विनामूल्य वितरक बनणं हा त्यांचा उद्देश आहे. लोकांच्या अंगी मेडिटेशनची सवय कारली जावी आणि ते त्यांना मोफत मिळावं यासाठी दैनंदिन आणि साप्ताहिक मार्गदर्शित मेडिटेशन, भाषणं आणि व्हिडीओंद्वारे आध्यात्मिक पद्धती आणि जागरूकता पसरवण्याचं ध्येय संस्थेनं हाती घेतलं आहे. संस्थेद्वारे आपल्या दैनंदिन जीवनात ज्याचा फायदा होईल असं तत्त्वज्ञान, प्राचीन ज्ञान, नवं तंत्रज्ञानाची निर्मिती केली जाते आणि वैज्ञानिक, व्यावहारिक दृष्टीकोन प्रदान केला जातो. श्रेयांस डागा फाऊंडेशन ही संस्थेद्वारे जटील विचारधारांना अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सर्वांसमोर अगदी मोफत सादर केले जाते. तसंच सर्वांना याचा लाभ घेता यावा यासाठी ते इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्येही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
काय असेल या कोर्समध्ये?मॅनिफेस्टेशन डीकोडेड कोर्स हा २८ दिवसांचा लाईव्ह ऑनलाइन मेगा मास्टर कोर्स आहे. या कोर्समध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना मेडिटेशनची सवय लावण्यासाठी, एक समुदाय तयार करण्यासाठी, व्यक्त होण्याचं तंत्रज्ञान शिकणं आणि जागरुकता यासाठी मार्गदर्शन केलं जातं. श्रेयांस डागा आणि वरूण डागा यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये या कोर्सचं आयोजन केलं असून दररोज १ ते २ तासांचं सत्र आयोजित करण्यात येतं. मॅनिफेस्टेशन डीकोडेड कोर्समध्ये चर्चा, मेडिटेशन, काही विषयांवर अभ्यास, कधी कधी होमवर्क आणि जर्नलिंगचाही समावेश करण्यात आला आहे. हा कोर्स तार्किक पद्धतीने तयार केला गेला असून यामध्ये विविध विषयांचा कालक्रमानुसार समावेश करण्यात आलाय. दरम्यान, यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या मागणीनुसार आणि अनेक लोकांना या कोर्सचा लाभ घेता यावा यासाठी यावेळी हिंदीतदेखील या कोर्सचं आयोजन करण्यात येणार आहे.
प्रवास प्रेरित करणाराआमच्यासोबत सहभागी झालेल्यांच्या परिवर्तनाच्या प्रवासाबद्दल ऐकून आम्हाला सर्वात मोठा आनंद मिळतो. आमच्यासोबत २८ दिवसांचा हा अविश्वसनीय प्रवास पूर्ण केल्यावर जगभरातील लाखो लोकांना सशक्त वाटतं हा त्यांचा अनुभव आम्हालाही अधिक प्रेरित करणारा असल्याची प्रतिक्रिया श्रेयांस डागा यांनी दिली.
चांगली झोप लागणे, भूतकाळातील आघातांमधून बाहेर येणं, निरोगी नातेसंबंध निर्माण करणं अशा अनेक गोष्टी यानंतर आम्ही लोकांकडून ऐकल्या. लहान असो किंवा मोठ्या प्रत्येक गोष्टी आमच्यासाठी मौल्यवान आहेत. याच सर्व गोष्टी श्रेयांस डागा फाऊंडेशन कुटुंबाला आपलं सर्वोत्कृष्ट देण्यास प्रवृत्त करत असल्याची प्रतिक्रिया वरुण डागा यांनी दिली.फाउंडेशनच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.