शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

​२८ मे : स्त्री आरोग्य दिनानिमित्त...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2017 2:14 PM

आज 28 मे स्त्री आरोग्य दिन असून या निमित्ताने जाणून घेऊया आजच्या महिलांच्या आरोग्याविषयी...

-Ravindra Moreआज 28 मे स्त्री आरोग्य दिन असून या निमित्ताने जाणून घेऊया आजच्या महिलांच्या आरोग्याविषयी...आपल्याकडे स्वयंपाक ही घरोघर महिलांचीच जबाबदारी. त्यामुळे एक दिवस जरी चारीठाव स्वयंपाक करायला जमलं नाही किंवा मुलं उपाशी राहिली किंवा त्यांना बाहेरून मागवून जेवावं लागलं तरी तिला याची रुखरुख लागते. अपराधी वाटतं. मात्र या सा:यात आपण आपल्या खाण्यापिण्याकडे, आरोग्याकडे किती लक्ष देतो हा साधा प्रश्न तिला पडत नाही. आजही तिच्या आरोग्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी कुणी तिला सांगताना दिसत नाही. बाळंतपणानंतर पोट सुटू नये म्हणून ‘तू तीन महिने पोटपट्टा बांध’ असं डॉक्टर किंवा घरचेही तिला सांगत नाहीत. तसंच गर्भपिशवी खाली उतरू नये म्हणून साधे सोपे व्यायाम प्रकार आहेत, पण त्याबद्दलही ती अनेकदा अनभिज्ञ असते. वेळच मिळत नाही म्हणते. दुसरीकडे इंटरनेट, स्मार्टफोनचा जमाना असल्यामुळे बाळासाठी काय खावं, काय करावं याचाच ती शोध घेते. ते सारं करते, पण स्वत:च्या आरोग्याविषयी किमान काही गुगलून ते करावं असं तिला वाटत नाही कारण ती आजही स्वत:च्या आरोग्याला अजिबात महत्त्व देत नाही, असं सावित्रीबाई फुले स्त्री संसाधनच्या सचिव डॉ. कामाक्षी भाटे सांगतात. खरंतर रोज स्वत:साठी थोडा वेळ काढून तिनं व्यायाम केला पाहिजे. स्वत:च्या आरोग्यासाठी सकस, योग्य आहार घेतला पाहिजे. पण अन्न फुकट जाईल म्हणून ती उरलेलं, रात्रीचं अन्न निमूट खाते. त्यातील पोषक तत्त्वे कमी झालेली असतात आणि मेद वाढलेला असतो.पण घरात कुणाला शिळं खाऊन तब्येत बिघडायचा त्रस नको आणि अन्नाची नासाठी नको म्हणून ती स्वत:च खाऊन टाकते.नोकरी करताना वेळ नाही हे पालुपद फक्त स्वत:च्या संदर्भात, बाकी इतरांसाठी धावतपळत ती सगळी कामं करतच असते. एवढंच कशाला, नोकरी करून निवृत्त झाल्यावरसुद्धा ती घरातली सारी कामं स्वत:वर ओढून घेते. इतकी वर्ष माझं तसं घराकडे दुर्लक्षच झालं म्हणत पोळ्या करणा:या बाईला सुटी देते. आपण आहे ना काम करायला, मग कशाला पैसे खर्च करा म्हणत कामच करते. स्वत:वर पैसे खर्च करण्याआधी दहादा विचार करते. स्वत:च्या ‘फिटनेस’साठी तर एक पैसा खर्च करायलाही तयार होत नाही. ती विचार करते, त्यापेक्षा मी घरात थोडं जास्त काम करेन. भाजी आणायला गेल्यावर थोडं जास्त चालायला जाईन. पण हे एवढंच करून ती फिट राहू शकत नाही. त्यासाठी रोज वेगळा वेळ काढून व्यायामच करायला हवा. आणि स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष न करता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा. स्वत:च स्वत:च्या आरोग्याचा विचार प्राधान्यानं करणं बायकांसाठी फार गरजेचं आहे, असं डॉ. भाटे सांगतात.आणि हीच कारणं असावीत की वरवर सा:या सोयीसुविधा बायकांच्या हाती दिसत असल्या, तरी आजही शहरासह खेड्यापाड्यात महिलांच्या आरोग्याचे प्राथमिक प्रश्न पूर्वी होते तसेच आहेत. आजही ५टक्के महिला ‘अ‍ॅनिमिक’ आहेत. म्हणजे त्यांच्या शरीरात रक्त कमी आहे. गर्भारपणात हे प्रमाण ८० टक्क्यांवर जातं. याप्रश्नी महिलांनी काय करायला हवं असं विचार केला तर महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन मूलभूत गोष्टींचा सखोल विचार व्हायला हवा. एक म्हणजे हिमोग्लोबिन आणि दुसरं म्हणजे पोटाचा घेर. या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. निरोगी आरोग्यासाठी एक मंत्र महिलांनी कायम लक्षात ठेवून आचरणात आणायला हवा. ‘खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्तानं सावकाश खा आणि पोट भरायच्या आधी थांबा!’ हा मंत्र लक्षात ठेवला तर आपसुकच पोटाचा घेर आटोक्यात येतो. एवढं पथ्य जरी सांभाळलं तरी आरोग्याचे अनेक प्रश्न आटोक्यात येतील. तेच हिमोग्लोबिनचंही. हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण महिलांमध्ये १२ ते १४ ग्रॅम इतकं असावं. हिमाग्लोबिन योग्य प्रमाणात असल्यास मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता चांगली राहते. चिडचिड होत नाही. उत्साह, आनंदी राहता येते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अत्यंत सोप साधे घरगुती उपाय आहेत. पण अनेकदा फॅशनेबल जगात ते पटत नाहीत. स्वयंपाक करताना लोखंडी तवा, कढई, उचटणं वापरल्यास रोज चार मिलिग्रॅम लोह शरीराला मिळतं. याचाही शरीराला खूप फायदा होतो. डाएट फूडपेक्षा नाचणीचे आंबिल, उकड खाल्ल्यास त्याचाही हिमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो. आपलं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असल्यास हे घरगुती साधे-सोपे उपाय करावेत. हिमोग्लोबिन प्रमाणात आणि पोटाचा घेर एक सेंमीपेक्षा कमी राहिल्यास डॉक्टरांकडे जायची आवश्यकता फारशी उरणार नाही. पण हे सारं करायचं तर आपल्या प्राधान्यक्रमावर आपला क्रमांक वरचा हवा. आपली तब्येत धडधाकट ठेवून स्वत:कडे लक्ष देणंही गरजेचं आहे हे बायकांनीच मान्य करायला हवं. जग बदलण्यापूर्वी आपलीच मानसिकता बदलणं गरजेचं आहे, हे येत्या आरोग्य दिनानिमित्त आपण मान्य केलं तरी खूप मोठं काम होईल!*सुपरवुमन स्ट्रेस‘सुशिक्षित महिला या अचाट शक्तिशाली होण्याच्या जाळ्यात अडकत आहेत. या महिलांना आॅफिसमध्ये चांगले काम करायचं असतं. तिथे सर्वाेत्तम काम करताना मिळवलेली थाप त्यांना घरच्यांकडूनही अपेक्षित असते. पण त्यांना ही थाप आॅफिसच्या कामासाठी नव्हे, तर घरच्या कामासाठी हवी असते. म्हणजे दिवाळीत उत्तम चकल्या करते, तिच्या हाताला चव आहे असं घरी ऐकायचं असतं आणि प्रेङोण्टेशन उत्तम होतं म्हणून प्रमोशन, हे आॅफिसात ऐकायचं असतं. एकाच वेळी त्यांना चांगली कर्मचारी, आई, सून, बायको व्हायचं असतं. आणि आपण तशा आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात स्वत:च्या आरोग्यावर येणा:या ताणांकडे त्या दुर्लक्ष करतात. स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. मनावरही ताण येतोच, त्याच्याकडे काणाडोळा करतात. या सा:याचा ताण, त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मनावरही येत आहे. स्मार्ट आयुष्य जगण्याच्या आभासी वातावरणात आपण आपल्याकडेच लक्ष देणं बंद करतो आहोत का, याचा विचार महिलांनी करायलाच हवा!- डॉ. आशिष देशपांडे