आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे, कामाच्या वाढलेल्या व्यापामुळे, वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे भरपूर टेंशनमध्ये असतात. सतत टेंशन घेऊन घेऊन लोकांचं आरोग्य बिघडतं. म्हणजे काय तर त्यांचं खाण्या-पिण्याकडे लक्ष नसतं किंवा चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने जातात. ज्यामुळे स्थिती आणखी बिघडते. लोकांची आजकालची लाइफस्टाईल खूपच जास्त बदलली आहे. लोक नको त्या गोष्टींवर जास्त लक्ष देऊ लागले आहेत किंवा नको त्या गोष्टींचा जास्त विचार करू लागले आहेत.
त्यामुळे सततचं टेंशन आणि त्यावर योग्य उपाय न करणं लोकांच्या पथ्थ्यावर पडतं. हळूहळू शरीर आजारांचा घर बनून जातं. सततच्या टेंशनमुळे बीपी वाढतो, हृदयरोगांचा धोका वाढतो. हेच कारण आहे की, जगभरात हार्ट अटॅकमुळे जास्तीत जास्त लोकांचा जीव जातो. अशात लोकांनी आपलं टेंशन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. आता टेंशन कसं कमी करायचं हे अनेकांना माहीत नसतं. तर सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी टेंशन रिलीज करण्यासाठी तीन खास उपाय सांगितले आहेत.
सोशल मीडियापासून दूर रहा
तुम्हाला तुमचं टेंशन कमी करण्यासाठी चिंता दूर करण्यासाठी सगळ्यात आधी दिवसरात्र सोशल मीडिया बघणं बंद करावं लागेल. तुम्ही या गोष्टी दूर करून स्वत:साठी वेळ द्या. सोशल मीडियामुळे तुम्हाला जगात काय सुरू आहे हे तर कळेल, पण तुम्ही स्वत:पासून दूर जात असता. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर गरज असेल तेवढाच करा.
स्वत:वर प्रेम करा
तुम्ही आता कसे आहात त्याला महत्व द्या. स्वत:ला लाइक करणं सुरू करा. सोशल मीडियावरील फोटोंना लाइक करत बसण्यापेक्षा आता या वेळेला महत्व द्या. तुम्ही स्वत:वर प्रेम करायला लागले तर तुमची चिंता, तुमचा तणाव लगेच दूर होईल.
पॉवर नॅप
पचनक्रिया चांगली होण्यासाठी आणि एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही दिवसा काही मिनिटांची झोप घेणं गरजेचं आहे. जे लोक खूप जास्त चिंतेत असतात त्यांनी दुपारी थोडा वेळासाठी झोपणं फार गरजेचं आहे.