कोरोना व्हायरसच्या अशा अनेक केसेस दिसून येत आहेत. ज्यात व्यक्ती कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. पण कोरोनाची चाचणी केल्यानंतर मात्र चाचणी निगेटिव्ह आली आहे. असे रुग्ण चिंतेंचे कारण ठरले आहेत. कारण त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरू नाहीत. जर अशा स्थितीत स्वतःला क्वारंटाईन केले नाही त्यांच्यामार्फत व्हायरस वेगाने पसरू शकतो. कारण परत काही दिवसांनी चाचणी केल्यानंतर असे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत.
भारतात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी संक्रमणाचा वेग थांबलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यांना सामन्य फ्लू ची लक्षणं दिसत अहेत. सुरूवातीला त्यांची टेस्ट निगेटिव्ह येत आहे.
सध्या कोरोना रुग्णांची टेस्ट करण्यासाठी २ प्रकारच्या टेस्ट केल्या जात आहेत. पहिली RT-PCR आहे. ज्यात रुग्णाच्या नाकातील आणि तोंडातील स्वॅब घेतले जातात. दुसरी आहे एंटीबॉडी टेस्ट याद्वारे रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली जाते. यातील RT-PCR ही टेस्ट विश्वसनीय आहे.
टेस्ट निगेटिव्ह येण्याची ३ कारणं आहेत
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड १९ रुग्णांच्या तोंडातील स्वॅब घेऊन टेस्टिंग केलं जातं. तसंच म्यूकस मेंब्रेनचा काही पार्ट सॅम्पल म्हणून घेतला जातो. अनेकदा या नमुन्यामध्ये पुरेश्या संख्येत व्हायरस उपलब्ध नसतात. त्यामुळे टेस्टमध्ये दिसून येत नाही म्हणून रिपोर्ट निगेटिव्ह येतात.
अनेकदा कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन लाळेत कमी प्रमाणात असतं. हे इन्फेक्शन फुफ्फुसांमध्ये पोहोचल्यानंतर रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येतात. त्यामुळे चाचणी निगेटिव्ह होते.
RT-PCR टेस्टमध्ये कोरोना विषाणूंची RNA ची टेस्ट केली जाते. तेव्हा अनेकदा RNA तुटल्यामुळे टेस्ट निगेटिव्ह येते.
खुशखबर! कोरोनाच्या औषधांबाबत अमेरिकेतील कंपनीने केली मोठी घोषणा; जाणून घ्या
कोरोनाच्या ५ लसींवर अमेरिकेने दाखवला विश्वास; 'या' महिन्यात येऊ शकते कोरोनाची लस