शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मानसिक समस्यांमध्ये ३०० टक्के वाढ, कोरोना काळातील अहवाल निरीक्षण

By स्नेहा मोरे | Published: December 25, 2020 1:53 AM

mental problems : गेल्या वर्षाच्या अहवालानुसार, महिला-पुरुषांचे टेलिमेडिसीन वापराचे प्रमाण ७५-२५ होते, यंदा ते ६८-३२ टक्क्यांवर पोहोचले.

- स्नेहा मोरे

मुंबई : यंदा कोरोना संसर्गामुळे अचानक जाहीर झालेल्या लाॅकडाऊनचा सामान्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. टेलिमेडिसीन सोसायटी ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या काळात मानसिक आरोग्याच्या तक्रारींविषयी मार्गदर्शन घेण्याचे प्रमाण ३०० टक्क्यांनी वाढले. यात महिलांचे प्रमाण ३३ टक्के आहे. गेल्या वर्षाच्या अहवालानुसार, महिला-पुरुषांचे टेलिमेडिसीन वापराचे प्रमाण ७५-२५ होते, यंदा ते ६८-३२ टक्क्यांवर पोहोचले.  मुख्यतः ऑनलाइन मानसिक स्वास्थ्याविषयी सल्लामसलत घेण्याचे प्रमाण लाॅकडाऊनमध्ये वाढले, एरव्ही कधी आपल्या आरोग्याला महत्त्व न देणाऱ्या महिला यात अग्रक्रमी आहेत.अहवाल निरीक्षणानुसार, वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच ऑनलाइन कन्सल्टेशन करण्याकडे सर्वाधिक कल वाढला. २६ टक्के सामान्यांनी जनरल फिजिशियन, २० टक्के व्यक्तींनी त्वचाविकारतज्ज्ञ, १६ टक्के व्यक्तींनी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि अन्य प्रत्येकी सात टक्के व्यक्तींनी कान, नाक, घसा, बालरोगतज्ज्ञ या शाखा तज्ज्ञांकडून सल्ला, औषधोपचार घेतले.राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास चेन्नईत टेलिमेडिसीनचा वापर सर्वाधिक व्यक्तींनी केला. त्यानंतर बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता या शहरांतील टेलिमेडिसीनचे प्रमाण मागच्या वर्षाच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. अहवालानुसार, न्यूरोसर्जन, हृदयविकारतज्ज्ञ, ऑन्कोलाॅजिस्ट अशा तज्ज्ञांकडील शारीरिक तक्रारींविषयीचा ओघ ३२ टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण आहे.

ज्येष्ठ नागरिकही तंत्रज्ञानस्नेहीअहवालानुसार, ५० वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींनीही टेलिमेडिसीनला पसंती दर्शविली आहे. टेलिमेडिसीनच्या एकूण प्रमाणात हे प्रमाण १२ टक्के एवढे आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ५ टक्के होते.

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस