लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या वर्षी देशात दररोज सरासरी ३१ मुलांनी (१८ वर्षे वयाखालील) आत्महत्या केल्याची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालातून उघड झाली आहे. त्यावर्षी ११,३९६ मुलांनी आत्महत्या केली. त्यात ५,३९२ मुले व ६००४ मुली होत्या. त्यातील अनेक मुलांनी कोरोना साथीमुळे उद्भवलेल्या मानसिक तणावातून आत्महत्या केल्या असाव्यात असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
या अहवालात म्हटले आहे की, २०२० साली देशात ११.३९६ मुलांनी आत्महत्या केली. २०१९ मध्ये ९६१३ मुलांनी आत्महत्या केली होती. २०१८ साली हाच आकडा ९,४१३ इतका होता. २०२० मध्ये २०१९ पेक्षा १८ टक्क्यांनी व २०१८ पेक्षा २१ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी कौटुंबिक समस्यांपायी ४,००६, प्रेमप्रकरणातून १,३३७, आजारी असल्याने १,३२७ जणांनी आत्महत्या केल्या. अन्य कृत्यामागे बेकारी, दिवाळखोरी, व्यंधत्व, अमली पदार्थांचे सेवन अशी इतर कारणे होती.
यासंदर्भात सेव्ह द चिल्ड्रनचे उपसंचालक प्रभातकुमार यांनी सांगितले की, कोरोनाची साथ तसेच त्यामुळे शाळा बंद असणे अशा गोष्टींमुळे मुलांना विलक्षण एकाकीपणा जाणवू लागला होता.
शाळा बंद असल्याने एकाकीपणा nकोरोना साथीच्या काळात शाळा बंद असल्याने अनेक मुलांना घरीच राहावे लागले. त्यांचा मित्र, शिक्षक किंवा अन्य व्यक्तींबरोबरचा संवादच खुंटल्यासारखे झाले होते. त्यामुळे एक प्रकारचा एकाकीपणा आला. nत्यामुळेही मानसिक तणाव असह्य होऊन अनेक मुलांनी आत्महत्या केली असे बालकल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांचे मत आहे.