Unhealthy Gut Symptoms: आपल्या पचन तंत्रात आतड्यांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आतड्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले पाहिजे. आतड्यांमध्ये काही गडबड झाली सामान्यपणे आपल्याला समजत नाही. अनेकदा जर काही वेगळं जाणवलं तर सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. नंतर समस्या अधिक वाढते. अशात आतड्या खराब झाल्यावर शरीरात कोणती लक्षण दिसतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आतड्या खराब होण्याची लक्षण
1) ऑटोइम्यून डिजीज
अनहेल्दी डाएट आणि शरीरात जास्त सूज असल्याने आतड्या खराब होतात. या स्थितीत टाइप 1 डायबिटीस, रूमेटोइड आर्थराइटिस आणि सोरायसिससारख्या वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो.
2) गॅसची समस्या
आतड्यांमध्ये समस्या झाली तर पोट फुगणं, गॅस, अॅसिडिटीची समस्या सतत होत राहते. अशात यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. दुर्लक्ष कराल तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
3) वजन कमी करणं अवघड
जे लोक आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी आतड्या निरोगी राहणं फार महत्वाचं आहे. जर आतड्यांमध्ये काही समस्या झाली तर वजन कमी करण्याची प्रक्रिया स्लो होईल. कारण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पचन तंत्र मजबूत राहणं महत्वाचं असतं.
4) गोड खाण्याची ईच्छा
जर तुम्हाला अचानक जास्त गोड खाण्याची ईच्छा होत असेल जसे की, मिठाई, कॅंडीज, केक आणि सरबत पिण्याची ईच्छा होत असेल तर समजून घ्या की, आतड्यांमध्ये काहीतरी गडबड आहे. अशात वेळीच यावर उपचार करा, जेणेकरून समस्या वाढणार नाही.