कोरोना व्हायरसचं संक्रमण झपाट्याने पसरत असल्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाची सुरूवातीची लक्षणं सर्दी, खोकला, ताप अशी असल्यामुळे साधा ताप सर्दी, खोकला आला तरी लोक खूप घाबरत आहेत. आज आम्ही तुम्हाला सर्दी खोकला यांतून पसरत असलेल्या आजारांचं इन्फेक्शन होण्याचा धोका कोणत्या लोकांना जास्त असतो. याबाबत सांगणार आहोत. वातावरणातील बदलांमुळे सर्दी खोकल्याची, मासंपेशींमध्ये वेदना होण्याची समस्या उद्भवते. कमीतकमी एक आठवडा ही समस्या उद्भवते .
२ वर्षीपेक्षा कमी वय असलेली मुलं
लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यामुळे सतत आरोग्याच्या तक्रारी उद्भवत असतात. तज्ञांच्यामते ६ महिन्यांच्या बाळाला ताप, सर्दी अशी लक्षणं जास्तवेळ दिसून येत असतील रुग्णालयात भरती करावं लागतं. काहीवेळा ही स्थिती घातक सुद्धा ठरू शकते.
गरोदर महिला
गरोदरपणात अनेक हार्मोनल बदल होत असतात. गरोदर महिला पूर्णपणे निरोगी असेल तरी इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. बाळाच्या जन्मानंतर महिलांना २ आठवड्यापर्यंत अशक्तपणाचा सामना करावा लागतो. त्यावेळी ताप, सर्दी अशा समस्या सर्वाधिक उद्भवण्याचा धोका असतो.
६५ वयापेक्षा जास्त वयाचे लोक
वाढत्या वयात शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा कमी होते. त्यामुळे शरीर व्हायरस आणि बॅक्टेरियांचा सामना करणयासाठी असमर्थ असतं. आधीच आजारपणामुळे वेगवेगळी औषध सतत घेऊन त्यांच्या शरीरावर परिणाम झालेला असतो. अशावेळी शरीर चांगलं ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी पोषक आहार घेणं गरजेचं आहे.
आधीपासून आजार असलेले लोक
अस्थमा, निमोनिया, ब्रोकांयटिस यांसारखे फुप्फुसांचे आजार तसंच श्वसनासंबंधी समस्या असलेल्या लोकांना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. याव्यतिरिक्त हृदयाचे आणि पचनासंबंधी विकार असलेल्या लोकांना संक्रमित आजार लगेच आपल्या जाळ्यात ओढत असतात. अशा रुग्णांना दीर्घकाळ औषधांचे सेवन करणं सुद्धा शरीरासाठी घातक ठरत असतं.