Moringa Health Benefits: शेवग्याच्या शेंगा अशी भाजी आहे जी सामान्यपणे सांबर बनण्यात वापरली जाते. पण यापासून इतरही काही पदार्थ बनवले जातात. याची भाजीही लोक आवडीने खातात. अशात याचे फायदेही तुम्हाला माहीत असले पाहिजे. मेडिकल न्यूज टुडेच्या एका रिपोर्टनुसार, त्वचा आणि केसांसाठी शेवग्याच्या शेंगा फार फायदेशीर असतात. तसेच पोटासंबंधी समस्याही या शेंगानी दूर होते. चला जाणून घेऊ आहारात शेवग्याच्या शेंगाचा वापर आवर्जून का करावा.
लिव्हर - बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना लिव्हरसंबंधी समस्या होत आहेत. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीजच्या केसेसही भरपूर वाढत आहेत. या आजारात शेवग्याच्या शेंगाचं सेवन केलं तर फायदा मिळतो. या शेंगांमध्ये आणि पानांमध्ये एक पोषक तत्व असतं ज्याने लिव्हरवरील सूज कमी होण्यास मदत मिळते.
कोलेस्ट्रॉल - धमण्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जमा झालं तर अनेक गंभीर हृदयरोगांचा धोका वाढतो. यासोबतच हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. अशात शेवग्याच्या शेंगांचं सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. रिसर्चनुसार, यांचं नियमित आहारात समावेश केला तर कोलेस्ट्रॉल आणि ट्राईग्लायसेराइडची लेव्हल कमी होते.
अर्थरायटिस - हाडांसंबंधी आजार रूमेटाइड अर्थरायटिस फार गंभीर मानला जातो. या आजारामुळे शरीरात खूप वेदना होतात. अशात तुम्ही शेवग्याच्या शेंगांच सेवन केलं तर आराम मिळू शकतो. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व असतात जे रूमेटाइड अर्थरायटिसला रोखण्यास फायदेशीर आहे.
डायबिटीस - आजकाल सगळ्यात जास्त वाढलेला आजार म्हणजे डायबिटीस. चुकीच्या लाइफस्टाईलमुळे हा आजार लोकांना शिकार बनवत आहे. कमी वयातही लोक या आजाराचे शिकार होत आहेत. डायबिटीसमुळे शुगर लेव्हल कमी जास्त होणं धोकादायक ठरू शकतं. अशात शेवग्याच्या शेंगांचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. यात असलेल्या पोषक तत्वांमुळे ब्लड शुगर आणि इन्सुलिन लेव्हल मॅनेज करता येते.
ब्लड प्रेशर - हाय ब्लड प्रेशर असणं ही एक मोठी समस्या आहे. सतत ब्लड प्रेशर हाय होत असेल तर याने हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकही येऊ शकतो. अशात हे गरजेचं आहे की, ब्लड प्रेशर लेव्हल कंट्रोलमध्ये रहावी. अशात शेवग्याच्या शेंगांचं सेवन फायदेशीर ठरतं. यात असे काही तत्व असतात ज्याने ब्लड प्रेशर मॅनेज केलं जातं.