भाज्या कच्च्या खाव्यात की उकडून यावरून अनेक वाद पेटलेला असतो. सामान्यपणे असं मानलं जातं की, काही भाज्या किंवा फळं कच्चे खाणंच जास्त फायदेशीर असतं. कारण यातून शरीराला जास्त पोषक तत्व मिळतात. मात्र, अशाही बऱ्याच भाज्या आणि फळं आहेत जे उकडून खाल्लेत तर त्यातील पोषक आपल्या शरीराला दुप्पट फायदेशीर ठरू शकतात.
असं मानलं जातं की, काही खाद्यपदार्थ उकडून खाल्ल्याने त्या पोषक तत्वांच्या पावरहाऊस बनतात. इतकंच नाही तर उकडलेल्या गोष्टी खाल्ल्याने आपल्या शरीराची पचनक्रिया आणखी चांगली होते. अशात ५ खाद्य पदार्थांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पालक
पालक उकडल्यानंतर त्यातील ऑक्सालेट लेव्हल कमी होते. ज्यामुळे कॅल्शिअम आणि आयर्नचं अवशोषण वाढतं. ज्या लोकांच्या शरीरात कॅल्शिअम आणि आयर्न कमी आहे अशा लोकांसाठी उकडलेली पालक जास्त फायदेशीर ठरते. तसेच उकडलेली पालक पचन होण्यासही सोपी असते.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं एक शक्तीशाली अॅंटी-ऑक्सिडेंट आढळतं. जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतं. टोमॅटो उकडल्याने हे तत्व आणखी मजबूत होतं.
ब्रोकली
ब्रोकल उकडल्याने ग्लूकोसायनोलेट्स रिलीज करण्यास आणि त्याचं बॅलन्स ठेवण्यास मदत मिळते. ग्लूकोसायनोलेट्स कंपाउंडचा एक असा समूह आहे ज्याने कॅन्सर मुळापासून ठीक करण्यास मदत मिळते. उकडल्यानंतर ब्रोकली नरम होते ज्यामुळे ती चावणं आणि पचनही सहजपणे होते.
रताळी
रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. रताळी उकडल्याने यातील बीटा-कॅरोटीनची शक्ती आणखी वाढते. यातून मिळणारं व्हिटॅमिन ए तुमच्या डोळ्यांसाठी, इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतं.