मेटाबॉलिज्म शरीरातील एक असे कार्य आहे. ज्याद्वारे शरीरात उर्जा तयार होत असते. जर एखाद्या व्यक्तीचे मेटाबॉलिज्म मंद गतीचे झाले असेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात पुरेशी उर्जा राहत नाही. शरीर सुस्त, थकल्याप्रमाणे वाटते. शरीर उर्जेचा पुरेपूर वापर करू शकत नाही. त्यामुळे लठ्ठपणा येतो. याऊलट मेटाबॉलिजम फास्ट असेल कर शरीरात उर्जा खूप असते.
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी चांगला व्यायाम करणं गरजेचं आहे. तसंच आहार चांगला आणि संतुलित असायला हवा. चुकीचा आहार घेतल्यास शरीरातील मेटाबॉलिज्म व्यवस्थित राहत नाही. आज आम्ही तुम्हाला जास्त मेटाबॉलिज्म असलेल्या पदार्थांबाबत सांगणार आहोत. असे पदार्थ तुम्ही आहारातून वगळायाला हवेत.
बटाटा
बटाट्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन सी असते. दररोजच्या जेवणात बटाट्याचा समावेश केल्यास वजन वाढते.
तांदूळ
जास्त कार्बोहायेड्रेट असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते. असे चरबी वाढवणारे पदार्थ टाळा.
गोड पदार्थ
साखरेचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने मेटाबॉलिज्म मंद गतीने होतं. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते. इतकंच नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यानं वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला गोड खावसं वाटत असेल तर फळांचा आहारात समावेश करा.
मादक पदार्थ
अल्कोहोलचं सेवन केल्यानंतर शरीरातील मेटाबॉलिज्म स्लो होतं. त्यात मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे लिव्हरवर वाईट परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त या पदार्थाचं सेवन केल्यास लठ्ठपणा येऊ शकतो.
कोरोनापासून बचावासाठी भारतीयांचा 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी; ब्रिटेनमधील तज्ज्ञांचा दावा
मोठा दिलासा! निष्क्रिय होत आहे कोरोनाचा विषाणू; 'या' देशातील टॉप तज्ज्ञांचा दावा