Health Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य चांगलं असणं सगळ्यात महत्वाचं आहे. लोक आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. आजकाल काही कॉमन आजारांमुळेही आरोग्य खराब होतं. त्यामुळे अशा आजारांची माहिती मिळवण्यासाठी काही टेस्ट करणं फार गरजेचं असतं.
नॅशनल हेल्थ सर्विस यूकेच्या डिजिटल मेडिकल एक्सपर्ट डॉ. जटला यांचं मत आहे की, आजार धोक्याच्या लेव्हलला जाण्याआधी त्यांची माहिती मिळवली तर त्यांची गंभीरता कमी केली जाऊ शकते. 40 वयाआधी प्रत्येक व्यक्तीने काही टेस्ट करणं गरजेचं असतं. त्या कोणत्या हे खाली बघता येईल.
1) कॅन्सर
2) आयरन ब्लड टेस्ट
3) कोलेस्ट्रॉल
4) न्यूट्रिशन ब्लड टेस्टिंग
5) ब्लडप्रेशर
डॉ. जटला यांचा सल्ला आहे की, त्वचेचा कॅन्सर अलिकडे सगळ्यात कॉमन कॅन्सर झाला आहे. याच्या केसेस सतत वाढत आहेत. तुम्हाला त्वचेच्या अशा जागेंची काळजी घ्यावी लागेल ज्यांचा रंग बदलला आहे. तसेच चामखीळ किंवा पुरळवरही लक्ष ठेवावं लागेल.
डॉ. जटला यांनी तरूणांना आयरन ब्लड टेस्टिंगचा सल्ला दिला आहे. ज्यात आयरनची कमतरता झाल्यावर एनीमियाची माहिती मिळवता येईल. एनीमियाने थकवा, श्वास घेण्यास समस्या आणि त्वचेसंबंधी समस्यांसोबतच इतरही समस्या होतात. जर आयरन नसलेले पदार्थ जास्त खात असाल तर एनीमिया होऊ शकतो.
डॉ. जटला यांनी सांगितलं की, चुकीच्या लाइफस्टाईलमुळे तरूणांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. जसे की, फार जास्त फॅट असलेले पदार्थ खाणं आणि स्मोकिंग करणं. नॅशनल हेल्थ सर्विसनुसार, पाचपैकी दोन किंवा त्यापेक्षाजास्त लोकांना हाय कोलेस्ट्रॉल असतं. ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी मद्यसेवन बंद केलं पाहिजे. स्मोकिंग बंद केलं पाहिजे. तसेच रोज एक्सरसाइज केली पाहिजे.