अक्कल दाढ म्हणजे दातांच्या शेवटी येणारा दात. याला लोक अक्कल दाढही म्हणतात. जेव्हा जवळपास सगळे दात आलेले असतात तेव्हा अक्कल दाढ येते. अनेक लोकांना अक्कल दाढ ही 17 ते 25 वयादरम्यान येते. तर काही लोकांना ही 25 वयानंतरही येते. अक्कल दाढ येतांना फार वेदना होतात. इतक्या की खाणं-पिणंही बंद होतं. या वेदना थांबवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
का होतात अक्कल दाढेत वेदना?
अक्कल दाढेच्या वेदनेवर उपचार करण्याआधी या वेदना का होतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. अक्कल दाढ सर्वात शेवटी येते. ही दाढ बाहेर येत असताना असह्य वेदना होतात. ही दाढ वर येताना इतर दातांना पुश करत वर येते. त्यामुळे हिरड्यांमध्ये वेदना, सूज अशा समस्या होतात.
1) कोमट पाण्याने गुरळा करा
अक्कल दाढ आल्याने हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर कोमट पाण्यात मिठ टाकून गुरळा करा. मिठ घातलेल्या या पाणाने केवळ 2 ते 3 मिनिटेच गुरळा करा. याने वेदना कमी होतील.
2) बर्फाचे तुकडे
जर दातांमध्ये वेदना होत असतील तर बर्फाचे छोटे छोटे तुकडे करुन दातांजवळ ठेवा. याने वेदना आणि हिरड्यांची सूज कमी होईल. सूज आणि वेदना पूर्णपणे बंद होईपर्यंत हा उपाय करा.
3) हिंगाचा वापर
(Image Credit: Agusthiar Organic)
चिमुटभर हिंग मोसंबीच्या रसात मिश्रित करुन कापसाच्या मदतीने अक्कल दाढेजवळ ठेवा. याने वेदना कमी होतील आणि अक्कल दाढेचा इतर दातांवर प्रभावही होणार नाही.
4) लवंगही फायद्याची
लवंगमध्ये दातामधील बॅक्टेरिया आणि किटाणू नष्ट करण्याची क्षमता आहे. अशात अक्कल दाढेमुळे वेदना होत असतील तर त्या दाढेजवळ लवंग ठेवल्यास वेदना कमी होतील.
5) कांद्याने वेदना करा कमी
असे म्हटले जाते की, जे लोक रोज कच्चा कांदा खातात त्यांना दातांच्या समस्या कमी होतात. कांद्यामध्ये दातांमधील किटाणू नष्ट करण्याचे गुण आहेत. जर तुम्हाला अक्कल दाढेचा त्रास होत असेल तर कांद्याचा तुकडा दाताजवळ ठेवून चावा. याने तुम्हाला आराम मिळेल.