शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

हिवाळ्यात 'या' फूड्सचं सेवन करणं ठरतं फायदेशीर, अनेक आजार आजूबाजूलाही येणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 11:12 AM

Winter Care Tips : हे पदार्थ खाऊन तुम्हाला थंडी वाजणार नाही. याचा फायदा असा होईल की, थंडीच्या दिवसातील थंड हवेमुळे तुम्ही आजारी पडणार नाही. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे पदार्थ...

Winter Care Tips : हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण वुलनचे कपडे वापरतात. याने शरीर गरम राहतं. त्यासोबतच असेही काही पदार्थ आहेत ज्यांचं सेवन करून तुमचं शरीर थंडीच्या दिवसात आतून गरम ठेवतात. हे पदार्थ खाऊन तुम्हाला थंडी वाजणार नाही. याचा फायदा असा होईल की, थंडीच्या दिवसातील थंड हवेमुळे तुम्ही आजारी पडणार नाही. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे पदार्थ...

गूळ

हिवाळ्यात गुळाचं सेवन करणं फार फायदेशीर ठरतं. कारण गूळ हा गरम असतो. अशात सर्दी-खोकला अशा समस्या दूर होतात. गूळ तुम्ही असाही खाऊ शकता. तसेच गुळाचा चहा किंवा लाडू वा चिक्की खाऊ शकता.

हिरवी मिरची

तिखट हिरव्या मिर्ची खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. मिर्चीचा तिखटपणा शरीराचं तापमान वाढवतो. ज्याने आतून गरम वाटतं. त्यामुळे थंडी दूर करण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात हिरव्या तिखट मिर्च खाऊ शकता.

ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स जसे की, बदाम, खजूर, मनुके इत्याही खाऊन तुम्ही शरीर आतून गरम ठेवू शकता. यातील पोषक तत्व जसे की, व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशिअम, कॉपर, झिंक, कॅल्शिअम आणि इतरही हेल्दी प्रोटीन असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

आले

आल्याचा गुणधर्म हा उष्ण असतो. हिवाळ्यात छोट्या छोट्या समस्या जसे की, खोकला, सर्दी-पळसा, घशात खवखव,  इन्फेक्शन, ताप इत्यादी दूर करण्यासाठी तुम्ही आल्याचे सेवन करू शकता. अनेकजण या दिवसात आल्याचा चहाही सेवन करतात. 

कांदा

या दिवसात कांदाही शरीराचं तापमान वाढवतो. कांदा तुम्ही अधिक खात असा तर शरीरातून घाम घेऊ लागतो. तसेच कांद्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. त्यामुळे या दिवसात भरपूर कांदा खावा.

हळद

हळदीचं सेवन केल्याने तुम्ही अनेक रोगांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव करू शकता. आयुर्वेदातही हळदीला फार महत्त्व देण्यात आलं आहे. गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने तुम्हाला गरम वाटेल आणि इन्फेक्शनपासूनही तुमचा बचाव होईल.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स