कोरोना व्हायरसचा धोका वातावरणातील बदलांमुळे वाढत आहे. आतापर्यंत कोणतीही लस किंवा औषध बाजारात उपलब्ध झालेलं नाही. रशियानं केलेल्या दाव्यानुसार या महिन्यात कोरोनाच्या लसीचे रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. तसंच ऑक्टोबरपासून लसीकरण मोहिम सुरू करण्यात येणार आहे. सध्या कोरोना विषाणूंशी निगडीत नवनवीन शोध समोर येत आहेत. कोरोना व्हायरसनं पिडित असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका किती असतो याबाबत संशोधन करण्यात आलं होतं.
जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापिठातील संशोधकांनी पाच बायोमार्कर अणुंचा शोध घेतला ज्यांचा संबंध कोरोना रुग्णांच्या मृत्यूशी होता. कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि शारीरिक स्थिती बिघडण्याशी याचा संबंध असतो. बायोमार्कर अणु रुग्णांच्या रक्तात असतात. याद्वारे मेडिकल इंडिकेटर्सचं काम केलं जातं. हे संशोधन जर्नल फ्यूचर मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमित २९९ रुग्णांवर हे परिक्षण करण्यात आलं होतं.
१२ मार्च ते ९ मे या दरम्यान जॉर्ज वॉशिंग्टन रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांचा यात समावेश होता. २९९ पैकी २०० रुग्णांमध्ये ५ बायोमार्कर अणु दिसून आले. सीआरपी, आइएल-6, फेरेटिन, एलडीएच आणि डी-डिमर हे पाच बायोमार्कर अणु होते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार बायोमार्कर अणुंमुळे कोरोना संक्रमित रुग्णांच्या शरीरात जळजळ, सूज येणं, रक्तस्त्राव वाढणं अशी लक्षणं दिसून येत होती. त्यामुळे व्हेटिलेटरवर ठेवण्याची स्थिती उद्भवली होती.
जॉर्ज वॉशिंग्टन विदयापिठातील साहाय्यक प्राध्यापक आणि साहाय्यक तज्ज्ञ जॉन रिस यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये सुरूवातीला झालेल्या संशोधनातून दिसून आलं होतं की कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि बायोमार्कर अणु यांचा संबंध आहे. अमेरिकेतील संशोधनातूनही हीच बाब समोर आली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना रुग्णांचे उपचार करताना कोणाची शारीरिक स्थिती कितपत खालावत आहे, तसंच सुधारणा दिसून येत आहे. याबाबत कळणं कठीण असतं.
हे पण वाचा-
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा
लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा
CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार
मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस