किडनी आपल्या शरीराची सफाई करते, त्यामुळे किडनी हेल्दी ठेवणं फार गरजेचं आहे. जर किडनी खराब झाली तर रक्तात विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. या विषारी पदार्थांमुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं नुकसान होतं. रूग्णाचा जीवही जाऊ शकतो.
डॅमेज झाल्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट करावं लागू शकतं. यात हेल्दी किडनी लावली जाते, ज्यांचे फिल्टर बरोबर असतील. किडनीचे हेच फिल्टर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. अशात काही फळं किंवा पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. असं केलं नाही तर किडनी लवकर खराब होऊ शकते.
फिल्टर खराब झाल्यावर वाढतात विषारी पदार्थ
यूरिक अॅसिड
अमोनिया
यूरिया
क्रिएटिनिन
अमिनो अॅसिड
सोडियम
जास्त पानी
किडनीचं नुकसान करू शकतात केळी
जर तुम्हाला किडनीसंबंधी काही समस्या असेल तर केळी अजिबात खाऊ नये. कारण यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. ज्याच्या अधिक प्रमाणामुळे किडनीचे फिल्टर खराब होतात.
सालीसोबत बटाटे
JRNJournal च्या रिसर्चनुसार, बटाट्यामध्येही पोटॅशिअमचं प्रमाण खूप जास्त असतं. ते सालीमध्ये अधिक असतं. त्यामुळे बटाटे सालीसोबत खाणं टाळलं पाहिजे. याने किडनी हळूहळू खराब होते.
दूध आणि दही
दूध किंवा त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्येही किडनी खराब करणारे तत्व असतात. त्यामुळे किडनीच्या रूग्णांची यांचं सेवन कमी केलं पाहिजे.
टोमॅटोमुळे वाढतं पोटॅशिअम
टोमॅटो किंवा त्याची पेस्ट कमी प्रमाणात खाल्ली पाहिजे. कारण याने किडनी खराब करणारं पोटॅशिअम शरीरात फार जास्त प्रमाणात वाढू शकतं. एका मध्यम आकाराच्या टोमॅटोमध्ये साधारण 290 मिलीग्राम पोटॅशिअम असतं.
डाळी
पोट आणि आरोग्यासाठी डाळी चांगल्या असतात. पण याचं जास्त प्रमाण किडनीच्या फिल्टरसाठी अजिबात चांगलं नाही. 1 कप शिजलेल्या डाळीमध्ये साधारण 730 मिलीग्राम पोटॅशिअम असतं.