तुम्ही जर दिवसाची सुरुवात चहाने करत असाल तर सावध व्हा. अनेकांना जास्त चहा पिण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना सकाळी उठल्यावर चहा हवाच असतो. पण सकाली रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. सोबतच अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. चहामध्ये काही असे अॅटीऑक्सिडेंट्स असतात जे फायदेशीर असतात पण चहा योग्य वेळेवर प्यायल्यानेच फायदा होतो. चला जाणून घेऊ सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने तुम्हाला काय नुकसान होऊ शकतात.
गंभीर आजारांचा धोका
चहामध्ये कॅफीन असतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेच तुम्ही चहा पित असाल तर तुमच्या ब्लड प्रेशरवर याचा प्रभाव पडतो. त्यामुळे रिकाम्यापोटी चहा घेणे घातक आहे. रात्रभराच्या झोपेत शरीरात वेगवेगळ्या प्रक्रिया होतात, सोबतच अनेक हार्मोनल बदलही होतात. अशात सकाळी चहा पिण्याची सवय शरीरासाठी चांगली नसते. कॅफीनमुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्टेरॉइड हार्मोन्स वाढतात, ज्याने शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यात प्रामुख्याने हृदयासंबंधी आजार, डायबिटीज आणि वजन वाढणे या समस्या होतात.
मेटाबॉलिज्म होतं प्रभावित
सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिक सिस्टम प्रभावित होतं. खरंतर चहामध्ये अॅसिडीक आणि अल्कलाइन तत्व असतात. हे तत्व शरीरातील मेटाबॉलिज्म प्रभावित करतं. या कारणाने छातीत जळजळ होण्यासारख्या आणखीही काही समस्या होऊ शकतात. रिकाम्यापोटी चहा पिणाऱ्यांना नेहमी थकवा आणि चिडचिडपणा याचा सामना करावा लागू शकतो.
चहा करतो शरीराला डिहायड्रेट
चहामध्ये डाययूरेटिक गुण असतात त्यामुळे चहा प्यायल्यावर शरीरातील पाणी बाहेर येतं. जर तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी चहा पित असाल तर तुम्हाला जास्त तहाण लागण्याची समस्या होऊ शकते. ६ ते ७ तासांच्या झोपेमुळे शरीरातील पाणी आधीच कमी होतं, अशात त्यावर चहा प्यायल्याने डिहायड्रेट होतं. त्यासोबतच सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने सतत लघवीला जाण्याची समस्या होऊ शकते.
तोंडाचं आरोग्यही होतं प्रभावित
अनेकांना सवय असते की, ब्रश न करताच किंवा पाण्याने गुरळा न करताच ते चहा घेतात. ही सवय तुमच्यासाठी घातक छरु शकते. जेव्हा सकाळी तुम्ही चहा घेता तेव्हा तोंडातील बॅक्टेरिया चहामधील शुगर मारते आणि तोंडाचं अॅसिडिक लेव्हल वाढतं. याकारणाने दातांवरील आवरणही घटतं. याने दातांना झिणझिण्या येणे ही समस्याही होऊ शकते.
पोट फुगणे आणि गॅस
चहामध्ये दुधाचा वापर होतो. दुधामध्ये लॅक्टोज अधिक प्रमाणात असतं त्यामुळे सकाळी रिकाम्यापोटी चहाचं सेवन करणं चांगलं नाही. लॅक्टोर जास्त असल्याकारणाने अनेकदा सकाळी सकाळी चहा प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. त्यासोबतच अनेक लोकांना गॅस आणि पोटाचीही समस्या होऊ शकते.