हिमोग्लोबिनप्रमाणेच रक्तातील महत्त्वाचा घटक म्हणजे प्लेटलेट्स. रक्त पातळ होऊ न देण्याचे काम प्लेटलेट्स करत असतात. तसेच शरिराला जखम झाल्यास अधिक प्रमाणावर होणारा रक्तस्राव रोखण्याचे कामही प्लटलेट्स करतात. आपल्या शरिरात लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स या तीन प्रकारच्या पेशी असतात. या पेशींपैकी रक्तात सर्वात जास्त प्रमाण हे प्लेटलेट्सचे असते. वैद्यकीय भाषेत प्लेटलेट्सला थ्रोम्बोसाईट्स असे म्हटले जाते.
डेंग्यू, मलेरिया, अनुवंशिक आजार, केमोथेरपी ट्रिटमेंटमुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. निरोगी व्यक्तिच्या शरिरात सामान्यतः दीड हजार ते साडेचार लाख इतकी असते. शरिरातील प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर बाहेरून प्लेटलेट्स घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. औषधांनी प्लेटलेट्स वाढवता येत नाहीत. त्यामुळे पौष्टिक आहारातून शरिरातील प्लेटलेट्सचे प्रमाण वाढवता येते. आहारातून प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पुढील फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.
पपई -
पपईसोबतच पपईच्या झाडांच्या पानांचाही शरिरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयोग होतो. डेंग्यूमुळे रूग्णाच्या शरिरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. त्यावेळी पपईच्या पानांच्या रसाचे सेवन केल्याने प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.
पालक -
पालकच्या भाजीचाही प्लेटलेट्स वाढवण्यात मदत होते. पालकच्या भाजीमध्ये 'क' जीवनसत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. तसेच पालकचे सेवन केल्यामुळे रक्तस्रावाचा धोकाही कमी असतो.
आवळा -
शरिरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळ्याचाही उपयोग होतो. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात 'क' जीवनसत्व असते. ज्यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. रोज 4 ते 5 आवळ्यांचे सेवन केल्याने रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण वाढते.
गुळवेल -
गुळवेलीचा रस रक्तातील प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी गुणकारक ठरते.
नारळ पाणी -
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे.