Early Signs Of Kidney Damage: किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करून लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम किडनी करतात. रक्त शुद्ध करण्याचं कामही किडनी करतात. पण किडनी जर खराब झाल्या तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. ज्यामुळे वेगवेगळ्या गंभीर समस्या होतात. आजकालच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किडनींच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडत आहे. अशात किडनीच्या आजारांसंबंधी लक्षणं तुम्हाला माहीत असले पाहिजेत. जेणेकरून वेळीच उपचार करता येतील.
अनेकदा लघवी लागणे
जर तुम्हाला रात्री पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत अशेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हा किडनी खराब झाल्याचा संकेत असू शकतो. जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाही तेव्हा शरीरातील अतिरिक्त तरल पदार्थ बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे रात्री पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं.
झोप न येणे
जर तुम्हाला रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर हा किडनी डॅमेजचा संकेत असू शकतो. किडनीसंबंधी समस्या असेल तर झोप न येण्याची समस्या होते. जर तुम्हालाही खूप काळापासून असं होत असेल तर वेळीच सावध व्हा.
पायांवर सूज
रात्र होताच तुमच्या पायांमध्ये आणि टाचांवर सूज वाढत असेल तर हेही किडनी डॅमेजचं लक्षण असू शकतं. किडनी खराब झाल्याने तरल पदार्थांचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे पायांवर सूज येते. जर तुम्हालाही असं काही होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
झोपताना श्वास घेण्यास समस्या
जर रात्री झोपताना तुम्हाला श्वास घेण्याची समस्या होत असेल तर हा किडनी डॅमेजचा संकेत असू शकतो. किडनी डॅमेज झाल्याने शरीरात तरल पदार्थ जमा होतात. जे फुप्फुसात पोहोचतात आणि त्यामुळे श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.
सतत थकवा आणि कमजोरी
रात्री खूपजास्त थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर हा किडनी डॅमेजचा संकेत असू शकतो. किडनी जेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही तेव्हा यामुळे थकवा आणि कमजोरी जावणते. अशावेळी लगेच डॉक्टरांना भेटा आणि योग्य ते उपचार घ्या.
किडनी हेल्दी ठेवणारे ड्रिंक्स
१) पुदीना असलेलं लिंबू पाणी
एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, पुदीन्याची पाने आणि थोडी साखर टाकून चांगलं मिक्स करून घ्या. हे ड्रिंक किडनी हेल्दी ठेवण्यासाठी चांगलं मानलं जातं.
२) मसाला लिंबू सोडा
एका ग्लासमध्ये लिंबाचा रर, जिरे-धणे पावडर, चाट मसाला आणि सोडा चांगलं मिक्स करा. अशाप्रकारे तुमचं किडनीसाठी हेल्दी ड्रिंक झालं.
३) नारळाचं पाणी आणि लिंबू
हे हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात नारळाचं पाणी टाका. या पाण्यात लिंबाचा रस टाकून याचं सेवन करा. याने तुमची किडनी निरोगी आणि फीट राहते.