Benefits of cauliflower leaves : फ्लॉवरची भाजी अनेक लोक आवडीने खातात. भारतीय घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी या भाजीचा वापर केला जातो. पण जास्तीत जास्त लोक याचा पांढरा भागच खाणं पसंत करतात. पण याच्या पानांमध्ये आणि मुळातही अनेक पोषक तत्व असतात. जर तुम्ही ही पाने कचरा समजून फेकत असाल तर चूक करताय.
जास्तीत जास्त लोक फ्लॉवर म्हणजे फूलकोबीची पाने कचरा समजून फेकून देतात. पण ही पाने खाण्यासाठी फार फायदेशीर असतात. या पानांमध्ये फ्लॉवर पांढऱ्या भागापेक्षाही जास्त प्रोटीन, फायबर, फॉस्फोरस आणि तीन पटीने जास्त खनिजासोबत आयरन आणि कॅल्शिअम असतं. याच्या सेवनाने मिळणारे फायदे जाणून घेऊया.
डोळ्यांसाठी फायदेशीर
इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक अॅन्ड इंजिनिअरिंगच्या एका स्टडीनुसार, फ्लॉवरच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. याच्या सेवनाने सीरम रेटिनॉलचं प्रमाण वाढतं. जे डोळ्यांना निरोगी ठेवलं आणि रातआंधळेपणासाठीही हे फायदेशीर असतात.
डायबिटीस रूग्णांसाठीही फायदेशीर
या पानांमध्ये हाय प्रोटीन आणि फायबरसोबतच कमी प्रमाणात कार्बोहायड्रेटही आढळतं. अशात याच्या सेवनाने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर डायटमध्ये फ्लॉवरच्या पानांचा समावेश करणं फायद्याचं राहील.
पोषक तत्व
एका स्टडीनुसार, फ्लॉवरच्या पानांमध्ये प्रोटीन आणि खनिज भरपूर प्रमाणात असतं. जे मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतात. फ्लॉवरच्या पानांचं रोज कुपोषित मुलांनी सेवन केलं तर याचे फार फायदे होऊ शकतात. यामुळे त्यांची उंची, वजन आणि हीमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळेल.
रक्ताची कमतरता करतात दूर
फ्लॉवरच्या पानांमध्ये आयरन भरपूर प्रमाणात असतं. अशात रक्ताची कमतरता दूर कऱण्यासाठी याचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. याच्या 100 ग्राम पानांमधून 40 मिलीग्राम आयरन मिळतं.
हार्टसाठीही फ्लॉवरची पाने फायदेशीर
फ्लॉवरच्या पानांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण भरपूर असतात. जे हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्याचं काम करतात. सोबतच यात असलेल्या लो फॅट आणि हाय फायबरमुळे ही पाने कार्डियक रूग्णांसाठीही फायदेशीर ठरतात.
कॅल्शिअमने भरपूर पाने
फ्लॉवरच्या या पानांमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. अशात हाडांचं दुखणं, गुडघेदुखी, ऑस्टियोपोरोसिसने पीडित लोकांसाठी फ्लॉवरची ही पाने फार फायदेशीर ठरतात.