कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील देशातील शासनांचे प्रयत्न सुरू असून शास्त्रज्ञ लस किंवा औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे सोशल डिस्टेंसिंग. सोशल डिस्टेंसिंग म्हणजेच लोकांमध्ये अंतर ठेवणं गरजेंच आहे. अलिकडे कोरोना व्हायरसचा हवेमार्फत होणारा प्रसार या विषयावर रिसर्च सुरू होता.
यात असं दिसून आलं की, शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समधून १८ फुटांपर्यंत व्हायरस पसरू शकतो. साइप्रसच्या निकोसिया विद्यापिठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार व्हायरसचं हवेत पसरणं हेच संक्रमणाचं कारण ठरतय का? ही बाब समजणं या संशोधनामुळे शक्य होऊ शकेल.
५ सेकंदात १८ फूटांपर्यंत लाळेचा प्रसार होऊ शकतो.
फिजिक्स ऑफ फ्लूएड यात प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं की, साधारणपणे चार किलोमीटर प्रतितास हवा सुरू असेल तर ५ सेकंदात १८ फूटांपर्यंत जाऊ शकते. निकोसिया विद्यापीठाचे प्रोफेसर दिमित्रिस ड्रिक्ककिस यांनी दिलेल्या माहितीनुसार लाळेचे थेंब वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना संक्रमित करू शकतात. वयस्कर लोकांना आणि लहान मुलांचा याचा जास्त धोका असतो.
संशोधकानी सांगितले की, लाळ हा तरल पदार्थ खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हवेत मिसळल्यामुळे लोकांना प्रभावीत करत असतो. या रिसर्चमध्ये दिसून आलं की, हवेत लाळेचे थेंब पसरल्यानंतर तापमान आणि आद्रतेचा प्रभाव पडत असतो. संशोधकांनी खोकणारी किंवा शिंकणारी व्यक्ती तसंच हवेतील लाळेचे थेंब यांची तपासणी करण्यासाठी एक कंप्यूटर सिमुलेशन तयार केले आहे. ज्याद्वारे तापमान आणि आद्रता यांचा व्हायरसच्या प्रसारावर कसा परिणाम होतो. याचा अभ्यास केला जाईल. यात १ हजारांपेक्षा जास्त लाळेच्या थेंबांवर रिसर्च करण्यात आला होता.
CoronaVirus News : पोटातील जंतू मारण्याच्या औषधाने होणार कोरोना नष्ट; तज्ज्ञांचा खुलासा
व्यवस्थित दात घासत नसाल तर कमी होऊ शकते रोगप्रतिकारकशक्ती, 'अशी' घ्या काळजी