Reduce High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील रक्तप्रवाह स्लो होतो. ज्यामुळे हृदयाच्या कामावर प्रभाव पडतो. जेव्हा रक्तात कोलेस्ट्रॉलची लेव्हल 200 मिलीग्राम/डीएलपेक्षा अधिक होते तेव्हा याला हाय कोलेस्ट्रॉल म्हणतात. ज्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. वेगवेगळ्या औषधांसोबतच डॉक्टर रूग्णांना हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला देतात.
अनेक केसेसमध्ये चांगली लाइफस्टाईल असूनही कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होत नाही. आज आम्ही अशाच 6 गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नेहमीच हाय राहते.
1) कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट प्लान योग्न नाही
जर तुम्हाला वाटत असेल की, झीरो फॅट आणि ऑर्गेनिक भाज्यांसोबत तुम्ही कोलेस्ट्रॉल सोबत लढण्याची तयारी करत आहात. तर हे जरा चुकीचं ठरेल. कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंटचा एक पूर्ण प्लान असतो. ज्यात डाएटची काळजी तर घ्यावीच लागते, सोबतच शरीर अॅक्टिव ठेवणं आणि औषध घेताना काळजीही घ्यावी लागते.
2) शारीरिक रूपाने सक्रिय न राहणे
जर तुम्हाला वाटत असेल की, 30 मिनिटे वॉक केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतं तर हे चुकीचं आहे. प्रत्येकाला शारीरिक रूपाने अॅक्विट राहण्याची वेगवेगळी गरज असते. जर तुम्ही नियमित व्यवस्थित एक्सरसाइज करत नसाल तर कोलेस्ट्रॉल जीवघेणा ठरू शकतो.
3) मद्यसेवन
मद्यसेवनाचा थेट प्रभाव कोलेस्ट्रॉल लेव्हलवर पडतो. जर तुम्ही नियमित रूपाने औषधं घेत असाल आणि सोबतच मद्यसेवनही करत असाल तर औषधांचा काहीच परिणाम होणार नाही.
4) केवळ औषधाने काही होत नाही
कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट तुम्ही विचार करता त्याहून मोठा प्लान आहे. यासाठी व्यक्तीला हेल्दी लाइफस्टाईल, नियमित व्यायाम आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषधे नियमित घेण्याची गरज असते. केवळ औषधांवर अवलंबून राहून चालणार नाही.
5) जास्त तणाव
आपल्या सगळ्यांनाच हे माहीत आहे की, कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी चांगलं नाही. कोलेस्ट्रॉल एका झटक्यात कमी करण्यासाठी स्वत:वर दबाव टाकू नका. डोकं शांत ठेवा आणि चांगली लाइफस्टाईल फॉलो करा. तरच कोलेस्ट्रॉल कमी केला जाऊ शकतो.
6) औषधांचे योग्य डोज
आणखी एक मुख्य कारण म्हणजे लोक औषधाचे योग्य आणि वेळेवर डोज घेत नाहीत. व्यक्तींनी नियमित रूपाने कोलेस्ट्रॉल लेव्हल चेक केलं पाहिजे आणि रिपोर्टबाबत डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. त्यांनी दिलेली औषधं नियमित घेतली पाहिजे.