Bad body odor : असे अनेक लोक आहेत जे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतात. पण तरीही त्यांच्या शरीरातून एक अजब प्रकारची दुर्गंधी येते. अर्थातच या समस्येमुळे चार चौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. ही समस्या कोणत्याही वयातील व्यक्तींना होते. ही दुर्गंधी हलकी किंवा तीव्र असते.
ही एक सामान्य समस्या आहे. असं मानलं जातं की, शरीराची दुर्गंधी केवळ तुमच्या शरीरातून येणारी एक अप्रिय दुर्गंधी आहे आणि ही घामामुळे येते. घाम येणं एक शारीरिक क्रिया आहे. पण हेही सत्य आहे की, घामाला गंध नसतो. पण घाम आल्यावर शरीरावरील कीटाणूंसाठी तो प्रजनानाचं काम करतो. घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मेडिकल उपचाराची गरज नसते. तुम्ही काही नैसर्गिक उपाय करूनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
अॅपल विनेगर
एक कॉटन पॅड घ्या आणि त्यावर थोडं अॅपल विनेगर टाकून घाम येतो त्या भागांवर लावा. विनेगर त्वचेची पीएच लेव्हल संतुलित करण्यास मदत करतं आणि दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सर्व बॅक्येरियांना मारतं.
टी ट्री ऑयल
2 चमचे टी ट्री ऑइल आणि 2 चमचे पाणी घ्या. टी ट्री ऑइलमध्ये पाणी मिक्स करा. हे पाणी थेट आपल्या अंडरआर्म्स आणि इतर भागांवर लावा. टी ट्री ऑइल एक नैसर्गिक अॅंटीसेप्टीक आहे. ज्याने तुमच्या शरीराची दुर्गंधी सहजपणे दूर होईल.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा तुम्ही टॅल्कम पावडरच्या रूपात वापर करू शकता. बेकिंग सोडा एक पाण्यात मिक्स करा आणि हे पाणी, काखेत, पायांच्या बोटांच्या मधे लावा. यासाठी एक कप पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाका. कपडे घालण्याआधी हे मिश्रण घाम येणाऱ्या भागांवर लावा.
ग्रीन टी
पाणी उकडून घ्या आणि त्यात ग्रीन टी ची काही पाने टाका. हे पाणी थंड झालं तर कॉटनच्या मदतीने ते घाम येणाऱ्या भागात लावा. चहा त्वचा शुष्क आणि गंधमुक्त ठेवण्यास मदत करते. याचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनदा करा.
टोमॅटोच्या पाण्याने आंघोळ
1 कप ताजा टोमॅटोचा रस घ्या आणि तो एक बकेट पाण्यात टाका. या पाण्याने आंघोळ करा. टोमॅटोमधील अॅंटीसेप्टीक गुण कोणत्याही प्रकारचा गंध निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करण्यास मदत करतो.
लिंबू आणि कॉर्नस्टार्च
लिंबू त्वचेची पीएच लेव्हर संतुलित करण्यास मदत करतं. 2 मोठे चमचे कॉर्नस्टार्च आणि लिंबाचा रस घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा आणि 10 मिनिटांनी ती स्वच्छ करा.