थंडीच्या दिवसात जास्त पाणी प्यायची गरज नसते? रोज ८ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडतात. शरीराला पाण्याची आवश्यकता असतेच पण लोकांच्या मनात पाणी पिण्याबाबत अनेक गैरसमज असतात. आज आम्ही तुम्हाला पाण्याशी निगडीत गैरसमज आणि फॅक्ट सांगणार आहोत, लखनौतील केअर इंस्टीट्यूट ऑफ लाईन सायंसेजमधील एमडी फिजिशिनयन डॉ. सीमा यादव यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधित माहिती दिली आहे.
१) रोज आठ ग्लास पाणी प्यायला हवं
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात पाण्याची गरज वेगवेगळी असते. माणसाचं वजन आणि शारिरीक हालचालींवर पाण्याची गरज अवलंबून असते. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे. पण आवश्यकता नसल्यास पाण्याचे अतिसेवन केले तर समस्या निर्माण होऊ शकते.
२) फक्त पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं
फळं आणि भाज्यांमध्येही पाण्याचं प्रमाण असतं. तुम्ही रोज जे अन्न खाता त्यात २० टक्के पदार्थ तरल असतात. नारळाचं पाणीसुद्धा एक चांगला पर्याय आहे. हे पाणी पिऊन तुम्ही आपली तहान भागवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही काहीही खात असाल त्यात पाण्याचं प्रमाण असतं.
३) हिवाळ्यात जास्त पाणी पिण्याची आवश्यकता नसते
थंडीच्या दिवसात तापमान कमी असतं. त्यामुळे लोकांना जास्त तहान लागत नाही. काही लोक कमी पाणी पितात कारण त्यांना वाटतं की थंडीच्या दिवसात जास्त पाणी पिण्याची गरज नसते. त्यामुळे त्वचा आणि श्वासांमध्ये मॉईश्चर कमी होऊ लागते. त्याला डिहायड्रेशनची समस्या असं म्हणतात. त्यामुळे ओठ फाटतात आणि त्वचा कोरडी पडते. त्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात स्वतःला डायड्रेट ठेवा.
कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा
४) पाणी प्यायल्यानं विषारी तत्व बाहेर निघतात
पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात असं अनेकजण म्हणतात. पाण्यानं शरीरातील सगळेच विषारी पदार्थ बाहेर निघत नाहीत. त्यासाठी औषधांची गरज असते. जास्त पाणी प्यायल्यानं युरीन तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊ शकते. म्हणून डॉक्टरांशी संपर्क साधून आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी प्या.
सायलेंट हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात ही लक्षणं; घाबरण्याआधीच जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
५) यू टीआयचे उपचार पाण्यानं होतात
हा देखिल एक गैरसमज आहे. लोकांना वाटतं की जास्त पाणी प्यायल्यानं शरीरातील बॅक्टेरिया निघून जातील आणि युटीआयची समस्या दूर होईल. पाणी प्यायल्यानं युटीआयच्या समस्येपासून आराम मिळतो पण त्याचे उपचार होऊ शकत नाहीत. तुम्हाला पोटाच्या खालच्या भागात वेदना होत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
६) जास्त पाणी प्यायल्यानं पचनक्रिया व्यवस्थित राहते
पाण्याविषयी अशी एक समज आहे की पाणी पिणे पचनसाठी चांगले आहे. अशा परिस्थितीत लोक अस्वस्थ पोटावर जास्त पाणी पितात, यामुळे रक्तदाब देखील वाढतो आणि अस्वस्थतेची समस्या देखील असते. जरी पाणी पिण्यामुळे पोटात जळजळ कमी होते, परंतु पचनशक्ती सुधारलेच असं नाही.