(Image Credit: Reader's Digest)
आठवडाभर खूपसारं काम करुन विकेंडला आपण थोडा आराम करतो. आता हे अनेकांच्या अंगवळणी पडलं आहे. आपण उठतो, काम करतो, पार्टी करतो आणि झोपतो. अनेकांच्या जगण्यात हा एकसुरीपणा आलाय. पण आपल्याला रिलॅक्स व्हायला खरंच वेळ मिळतो का? किंवा आपण खरंच रिलॅक्स होतो का? याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा वेळ गेलेली असते. कारण धावपळीच्या जीवनाने तुम्ही पार बदलून गेलेले असता. तुम्हाला आता नक्कीच एका ब्रेकची गरज असते. तुम्हाला ब्रेकची नितांत गरज कधी असू शकके याचे काही संकेत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1) तुम्ही सुट्टीवर असला तरी घरी असताना छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला येणारा संताप किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमची होणारी चिडचिड हा तुम्हाला ब्रेकची गरज असल्याचा संकेत आहे. जरा शांत व्हा आणि विचार करा की, तुम्ही कसे जगताय. तेव्हा तुम्हाला याची जाणिव होईल.
2) रोज ऑफिसमधील बिझी शेड्युलमुळे तुम्हाला स्ट्रेसची किंवा स्ट्रेसमध्ये काम करण्याची सवय झालेली असते. स्ट्रेस हा तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. पण एक वेळ अशी येते की, तुम्ही जराही स्ट्रेस सहन करु शकत नाही. स्टे्सच्या नावानेही तुम्हाला चिड यायला लागते. कामाच्या ठिकाणी स्ट्रेस येणारच त्याला पर्याय नाही. पण त्यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या ब्रेकची गरज आहे, असे समजा.
3) नेहमीची लोकं आणि नेहमीची ठिकाणं जेव्हा तुम्हाला बोरींग वाटायला लागतात, तेव्हा तुम्हाला ब्रेकची गरज आहे असे समजा. नेहमीची लोकंच कशाला तुमच्या आवडीची ठिकाणंही तुम्हाला कधी कधी नकोशी वाटतात. असे का होते आहे याचा विचार तुम्ही करायला हवा. जगण्याला एकांगीपणा आल्यावर असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
4) ब-याचदा तुम्ही तुमच्या मित्रांकडून किंवा सहका-यांकडून ऐकलं असेल की, तुला ब्रेकची गरज आहे. ते असे का म्हणाले असतील याचा विचार करा. त्यांना नक्कीच असं काहीतरी माहीत असेल किंवा जाणवलं असेल म्हणूनच ते असं म्हणाले असतील ना! मग त्याचा विचार कराच.
5) जर तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा सतत तुम्हाला कशाचा ना कशाचा त्रास होत असेल. तर तुम्हाला नक्कीच एका ब्रेकची गरज आहे.
6) सगळं काही ठिक सुरु असतानाही, घरी कोणतही भांडण नसतानाही किंवा सहका-यांचा कोणताही त्रास नसतानाही तुमचं कामात मन लागत नसेल. अनेकदा महत्वाची कामे असूनही तुम्हाला त्यात इंटरेस्ट येत नसेल, तर ब्रेक तो बनता है बॉस....
7) घरी बायको बरोबर तुमची सतत काहीना काही कारणावरुन भांडणं होत असेल, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही चिडचिड करत असाल तर नक्कीच काहीतरी बिनसलंय. अशात तुम्हाला ब्रेकची गरज आहे. दोन चार दिवस कुठेतरी बाहेर फिरुन या. नेमकं काय होतंय याचा विचार करा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा.