वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स तुम्ही ऐकत असता, पण तरी सुद्धा वजनाबाबत वेगवेगळ्या समस्या तशाच राहतात. तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी सोप्या उपायांचा शोध घेत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. खरंतर वजन कमी करणे ही फार मोठी आणि कठीण गोष्ट नाही, पण महत्त्वाची ठरते ती नियमितता. जर टिप्स तुम्ही काही दिवस कराल आणि नंतर कंटाळा करून सोडाल तर तुम्हाला फायदा होणार नाही.
आम्ही तुम्हाला रात्री करण्याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत. या ७ टिप्सच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी केवळ डाएट करून किंवा एक्सरसाइज करून चालत नाही. त्यासाठी योग्य नियोजन लागतं. चला जाणून घेऊ ७ टिप्स...
रात्री हलकं जेवण करा
रात्री जास्त जेवण करणं किंवा जेवण केल्यावर लगेच झोपणं तुमचं वजन वाढण्याचं कारण ठरू शकतं. तुमच्या शरीराला जास्त अन्न पचवायला वेळ लागेल आणि तुमच्याकडून सेवन करण्यात आलेल्या अन्नाचा वापर ऊर्जेच्या रूपात करण्याऐवजी फॅटच्या रूपात स्टोर केला जाईल. त्यामुळे रात्रीचं जेवण कमी करा किंवा हलकं खावे. तसेच जेवण झोपण्याच्या २ तासांपूर्वी करावं. रात्री जेवण केल्यावर निदान २० मिनिटे वॉक केला तर याने तुम्हाला मदत होईल.
पुदीन्याचा चहा
झोपायला जाण्याआधी एक कप पेपरमिंट टी तुम्हाला आराम देऊ शकते. याने तुमचा तणाव कमी होईल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल. याने तुमची भूक कमी होईल, खाण्याची लालसा कमी होईल, सूज कमी होईल आणि पोटही चांगलं राहील. तसेच याने पचनक्रियेला सुद्धा गती मिळेल.
आहारात प्रोटीनचा समावेश
जे लोक रात्रीच्या आहारात प्रोटीनचा समावेश करतात, त्यांची इतरांच्या तुलनेत सकाळी आरामदायी पचनक्रिया होते. असं होण्याचं कारण म्हणजे प्रोटीन कार्बोहायड्रेट किंवा फॅटच्या तुलनेत अधिक थर्मोजेनिक आहे. त्यामुळे हे बर्न करण्यासाठी तुमचं शरीर अधिक कॅलरी बर्न करतं.
थोडे काळे मिरे
काळे मिरे हे वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये सर्वात फायदेशीर आहे. याने फार जास्त फॅट बर्न होतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणात खाणार असलेल्या पदार्थांमध्ये काळ्या मिऱ्यांची ठोडी पावडर टाका.
केळी खा
जर तुम्हाला झोप येत नसेल तर झोपेची गोळी घेण्याऐवजी केळी खा. यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि ट्रिप्टोफॅन असतात, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.
रताळी खा
रताळी खाल्ल्यानेही तुम्हाला चांगली झोप लागेल. कारण यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. तसेच ताय मांसपेशींना आराम देणारं पोटॅशिअम सुद्धा असतं.