शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

78 वर्षांच्या डॉक्टरची कमाल, तब्बल 20 वर्षं वय घटवलं! सांगितले दीर्घकाळ तरुण राहण्याचे 3 फॉर्म्युले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 6:18 PM

क्लीव्हलँड क्लिनिकचे चीफवेलनेस अधिकारी डॉक्टर मायकल रॉइजन (Dr. Michael Roizen) यांचे वय 78 वर्षं एवढे आहे. मात्र, आपण आपले बायोलॉजिकल वय 20 वर्षांहूनही अधिक कमी केले आहे. आता आपले बायोलॉजिकल वय 57.6 वर्षं एवढे आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

आपण वजन घटवल्याची अनेक उदाहरणं ऐकली असतील. पण, वय घटवण्यासंदर्भात कधी ऐकलंय का? कधी विचा तरी केलाय का? आपण दीर्घायुष्य जगावे आणि ते आयुष्य निरोगी, ठणठणीत असावे, असे सर्वांनाच वाटत असते. सध्या, रिव्हर्स एजिंग आणि बायो हॅकिंग सारख्या अनेक टर्मची मोठी चर्चा होताना दिसत आहे. अनेक वैज्ञानिक आणि डॉक्टर असे काही मार्ग सुचवत आहेत, ज्यांद्वारे आपण आपली प्रणाली तरुण आणि ठणठणीत ठेवू शकतो.

क्लीव्हलँड क्लिनिकचे चीफवेलनेस अधिकारी डॉक्टर मायकल रॉइजन (Dr. Michael Roizen) यांचे वय 78 वर्षं एवढे आहे. मात्र, आपण आपले बायोलॉजिकल वय 20 वर्षांहूनही अधिक कमी केले आहे. आता आपले बायोलॉजिकल वय 57.6 वर्षं एवढे आहे, असा दावा त्यांनी केला आहे. याचबरोबर त्यांनी 3 पद्धतीही सांगितल्या आहेत. ज्यांचा अवलंब आपणही करू शकता.

कार्डिओ एक्सरसाइज -डॉक्टर रॉइजन यांनी बिझनेस इनसाइडरसोबत बोलताना दीर्घायुष्य आणि आपल्या हेल्थ-फिटनेसचा फॉर्म्युला सांगितला आहे. यांपैकी पहिला आहे कार्डिओ एक्सरसाइज. डॉक्टर रॉइजन आठवड्यातून 3 वेळा 48 मिनिटांपर्यंत कार्डिओवस्कुलर एक्सरसाइज नक्की करतात. यासाटी ते ट्रेडमिल अथवा एक्सरसाइज बाइकचा वापर करतात. आपल्याकडे, ट्रेडमिल नसेल तर, आपण ब्रिस्क वॉक (1 मिनिटांत 132 पावले), धावणे, स्वीमिंग, सायकलिंग अथवा दोरीवरच्या उड्या, यांपैकी काहीही करू शकता.

रेजिस्टेंस ट्रेनिंग -डॉक्टर मायकल आठवड्यातून दोन वेळा वेट लिफ्टिंग करतात. दीर्घायुष्यासाठी मसल्स तयार होणे आवश्यक आहे. यासाठी रेझिस्टन्स ट्रेनिंग करणे आश्यक आहे. 2022 मध्ये पब्लिश ब्रिटिश जर्नल स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमधून अशी गोष्ट समोर आली होती की, आठवड्यातील 30 ते 60 मिनिटांची रझिस्टन्स ट्रेनिंग अनेक घातक आजारांपासून आपला बचाव करू शकते. यात कॅन्सर आणि हार्ट अॅटॅक सारख्या आजारांचाही समावेश आहे.

चालणे -कार्डियो आणि वेट लिफ्टिंग बरोबरच, डॉक्टर रॉइजन रोज 10 हजार पावले चालतात. यासाठी ते अनेक गोष्टींचा अवलंब करतात. जसे की, कामाच्या ठिकाणी ट्रेडमिल डेस्क ठेवणे, गाडी ऑफिसपासून दूर पार्क करणे आदी. यामुळे व्यस्त असले तरीही त्यांचा स्टेप काउंट पूर्ण होतो. 2022 च्या आणखी एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, आपण आठवड्यातून 5 दिवस ब्रिक्स वॉक केल्यास मेंदू निरोगी राहतो, टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो आणि आपले आयुर्मानही वाढते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdoctorडॉक्टर