हार्टबर्नची समस्येने रोज कुणीना कुणी हैराण झालेलं असतं. हार्टबर्न व्यक्तीला छातीच्या बरोबर मधे जळजळ जाणवू लागते. ही समस्या काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंतची असू शकते. अनेकदा प्रेग्नेन्सी, गेस्ट्रोइसोफेगल फिफ्लक्स डिजीज किंवा अॅंटी-इनफ्लेमेटरी ड्रग्स घेतल्याने ही समस्या होते. पण छातीत होणारी ही जळजळ काही बाबतीत गंभीरही ठरू शकते.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आल आहे की, हार्टबर्नची समस्या कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा धोका वाढण्यासंबंधितही असू शकतो. त्यामुळे शरीराच याची काही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
- काही तासांपासून सतत छातीत दुखत असेल तर...
- छातीत जळजळीची लक्षणे गंभीर होणे किंवा असं सतत होणं
- गिळताना त्रास होणे किंवा वेदना होणे
- छातीत जळजळ होत असल्याने उलटी येणे
- शरीराचं वजन अचानक कमी होणे
- २ आठवड्यांपर्यंत हार्टबर्न किंवा इनडायजेशनची औषधे घेणे आणि नंतर लक्षणे जाणवणे
- गंभीरपणे घसा बसणे किंवा अस्वस्थता जाणवणे
कॅन्सर - हार्टबर्नशी संबंधित समस्या अनेक घशाच्या किंवा पोटातील आतड्यांच्या कॅन्सरचंही कारण असू शकते. आतड्यांमध्ये वाहणारं अॅसिड अनेकदा टिशू डॅमेज करतं आणि याने एसोफॅगस एडिनोकार्सिनोमा विकसित होतो. एका प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन लिनास वेनक्लॉसकास यांच्यानुसार, हार्टबर्नची कारण लगेच जाणून घेऊन उपचार घेतले गेले नाही तर एसोफॅगसला ट्रिगर करू शकतं. जो डायजेशन सिस्टीममध्ये होणारा एक प्री-कॅन्सर डिजीज आहे.
हायटस हर्निया - जेव्हा पोटाचा भाग डायफ्राममध्ये कमजोरीमुळे छातीचा खालचा भाग वरच्या दिशेने ढकलतो तेव्हा याला हायटस हर्निया म्हटलं जातं. ही समस्या छातीत वेदना किंवा जळजळ होतेवेळी चेक केल्यावरही पकडली जाऊ शकते. सामान्यपणे ही समस्या ५० पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये बघितली जाऊ शकते. जोपर्यंत लक्षण गंभीर होत नाही तोपर्यंत यावर उपचार करण्याचीही गरज पडत नाही. पण छातीत सतत जळजळ होत असेल तर यावर वेळीच उपचार करा.
पेप्टिक अल्सर डिजीज - पेप्टिक अल्सर डिजीजने ग्रस्त लोक नेहमीच याला छातीतील जळजळ समजून दुर्लक्ष करतात. हार्टबर्न आणि पेप्टिक अल्सर डिजीजची लक्षणे पूर्णपणे एकसारखी असतात. त्यामुळे मळमळ, उलटी, वेदना आणि ब्लीडिंगमुळे विष्ठेचा रंग बदलणे यासारख्या लक्षणांवरही लक्ष देणं गरजेचं आहे. असं झाल्यावर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा.
हार्ट अटॅक - हार्ट अटॅकच्या प्रकरणातही लोक अनेकदा याला हार्टबर्न समजून दुर्लक्ष करतात. यातील फरक जाणून घेण्यासाठी काही लक्षणांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. छातीत वेदना, छातीत जोरात जळजळ, चिकट त्वचा, इनडायजेशन आणि मळमळ यांसारखी लक्षणं हार्ट अटॅकचा वॉर्निंग साइन असू शकतो. छातीत जळजळसोबत वेदना, तोंड कडू पडणे, झोपल्यावर वेदना वाढणे, चटपटीत खाल्ल्यावर गळ्यापर्यंत जळजळ होणेही हार्टबर्नची प्रमुख लक्षणे आहेत.