लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कार्यालयात काम करताना थोडा वेळ झोप (पॉवर नॅप) घेतल्यास थकवा कमी होतो, तसेच कार्यक्षमतेत वाढ होण्यासह आरोग्यही चांगले राहत असल्याचे मत विविध क्षेत्रातील सुमारे ९४ टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
जपानमध्ये अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या ‘इनेमुरी’ संकल्पनेत ऑफिसमध्ये थोडा वेळ का होईना झोप घेतली जाते. त्यानुसार, मनुष्यबळ विकास क्षेत्रातील जीनियस कन्सल्टंटने केलेल्या नुकतेच सर्वेक्षण केले. त्यानुसार अनेक कर्मचाऱ्यांनी अल्पविश्रांतीबाबत सहमती दर्शविली. दिवसभरातील कामाच्या ताणतणावात, धावपळीत अल्प विश्रांती घेतल्यास कार्यक्षमता वाढून अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल, तसेच आरोग्यही चांगले राहण्यास मदत होईल, असे ९४% कर्मचाऱ्यांनी म्हटले.
२५ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या सर्वेक्षणात बँकिंग-फायनान्स, इंजिनिअरिंग, शिक्षण, एफएमसीजी, आदरातिथ्य, मनुष्यबळ विकास, आयटी, बीपीओ, लॉजिस्टिक, प्रसारमाध्यमांसह विविध क्षेत्रांतील १,२०७ कर्मचारी सहभागी झाले होते.
‘पॉवर नॅप’चे फायदेnमेंदूची कार्यक्षमता वाढतेnस्मरणशक्ती वाढतेnअचूकता आणि समयसूचकतेत वाढnतणाव हलका होण्यास मदत nरक्तदाब नियंत्रणात राहतोnप्रतिकारशक्ती आणि मूड चांगला राहतो
जपानमध्ये वाढता ट्रेंडकार्यालयीन वेळेत अल्पविश्रांती घेण्याचा ट्रेंड चांगलाच रूजला आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये आसन व्यवस्थाही तशाच प्रकारे तयार केली आहे. त्यानुसार ठराविक वेळेनंतर १५-२० मिनिटे विश्रांती घेण्यासाठी अलार्मही दिला जातो.