ABC Juice Benefits : लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूसचं सेवन करतात. काही ज्यूस भाज्यांपासून बनवले जातात तर काही ज्यूस फळांपासून. तर काही ज्यूस असे असतात जे दोन ते तीन गोष्टी मिळून तयार केलं जातं. असाच एक ज्यूस म्हणजे एबीसी ज्यूस. ए म्हणजे अॅप्पल, बी म्हणजे बीटरूट आणि सी म्हणजे कॅरेट म्हणजे गाजर एकत्र करून करून हा एबीसी ज्यूस तयार केला जातो. या ज्यूसमध्ये भरपूर फायबर, नायट्रेट्स, अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ए तसेच बीटा कॅरोटीनही असतं. एबीसी ज्यूस शरीर डिटॉक्ससाठी फायदेशीर मानला जातो. तसेच याने रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. अशात हा ज्यूस प्यायल्याने कोणकोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
पोषक तत्व
एबीसी ज्यूसचं सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन, खनिज आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळतं. या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, फोलेट, आयर्न आणि अनेक फायदेशीर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात.
मजबूत होते इम्यूनिटी
कमजोर इम्यूनिटीमुळे शरीर लवकर वेगवेगळ्या आजारांच्या जाळ्यात अडकतं. अशात इम्यूनिटी मजबूत ठेवणं गरजेचं असतं. तुम्ही जर नियमितपणे एबीसी ज्यूसचं सेवन केलं तर रोजप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
शरीर डिटॉक्स होतं
शरीरातील विषारी पदार्थ वेगवेगळ्या समस्यांचं कारण ठरतात. अशात शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी एबीसी ज्यूस खूप फायदेशीर ठरतो. एबीसी ज्यूस एक बेस्ट डिटॉक्स ड्रिंकसारखं काम करतं.
पचनक्रिया सुधारते
एबीसी ज्यूस पचनक्रिया सुधारण्यासही खूप मदत करतो. यात फायबर भरपूर असल्याने याचं सेवन केल्यास पचन तंत्र मजबूत राहतं. तसेच याने पचनासंबंधी समस्या, बद्धकोष्ठताही दूर होते.
हृदयसाठी फायदेशीर
एबीसी ज्यूस ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते. या ज्यूसच्या सेवनाने ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं, ज्यामुळे हृदयही निरोगी राहतं.
शरीराला मिळते एनर्जी
एनर्जी मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही या एबीसी ज्यूसचं सेवन करू शकता. अनेक व्हिटॅमिन्स असलेल्या या ज्यूसमध्ये नॅचरल शुगर असते. अशात ज्यूस प्यायल्याने एनर्जी बूस्ट होते आणि पुन्हा पुन्हा थकवा येत नाही.
त्वचेसाठी फायदेशीर
शरीरात आतून निरोगी राहिलं तर त्याचा प्रभाव वरच्या त्वचेवरही दिसतो. एबीसी ज्यूस प्यायल्याने त्वचेला आवश्यक अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. एबीसी ज्यूस प्यायल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
एबीसी ज्यूसमध्ये गाजर असतं, ज्यात हाय बीटा कॅरोटीन तत्व असतात. त्यामुळे हा ज्यूस डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर ठरतो. याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.
एबीसी ज्यूस बनवण्याची रेसिपी
साहित्य
१ ग्लास पाणी१ मोठा चमचा मध१ चमचा लिंबाचा रसगाजरबीटसफरचंद
कसा बनवाल?
गाजर, बीट आणि सफरचंदाचे छोटे-छोटे तुकडे करा. नंतर ते ब्लेंडर किंवा ज्यूसरमध्ये टाका. त्यात थोडं पाणी टाका. ज्यूस तयार झाल्यावर गाळून घ्या. यात टेस्टनुसार, लिंबाचा रस किंवा मध मिक्स करून सेवन करा.