शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

324 किलो वजन घटवून इमान चालली अबूधाबीला. तुम्हाला किती घटवायचंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2017 4:35 PM

इमानसारखे लठ्ठ नसाल(च) तुम्ही, पण पोटाचा घेर तुम्हालाही काबूत आणायचाय ना? मग हे दहा उपाय फक्त तुमच्यासाठी.

 - मयूर पठाडे

 
जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून जगप्रसिद्ध झालेली इजिप्तची इमान अहमद उपचारांसाठी आणि आपलं वजन कमी करण्यासाठी भारतात आली. आल्यापासून सर्व माध्यमांचं लक्ष तिनं आपल्याकडे वेधून घेतलं. तिला हवं होतं ते बर्‍यापैकी साध्य करतानाच नवा वाद निर्माण करून पुन्हा प्रसिद्धीचे झोत आपल्याकडे वळवून आता ती उद्या पुढील उपचारांसाठी भारतातून अबूधाबीकडे रवाना होत आहे. 
डॉ. लकडावाला आणि त्यांच्या टीमनं मुबंईतील सैफी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार केल्यानंतर तिचं वजन चांगलंच कमी झालं. पाचशे किलोवरुन चक्क 176 किलोपर्यंत घसरताना तिनं चक्क 324 किलो वजन कमी केलं.
अर्थातच हे वजन तिनं कमी केलं नाही, तर तिच्यावर ुउपचार करणार्‍या डॉक्टरांनी तिचं हे वजन कमी केलं आणि ती निदान उठू, बसू शकेल, हालचाल करू शकेल, इतपत ‘चैतन्य’ तिच्यात निर्माण केलं. पण आपल्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप करून 81 दिवसांच्या भारतातील मुक्कामानंतर ती आता दुसर्‍या देशात उपचारांसाठी रवाना होते आहे.
मुळातच काही नैसर्गिक व्याधी घेऊन जन्माला आलेल्या इमानला सुरुवातीपासूनच लठ्ठपणाचा त्रास होता. ती जन्माला आली तेव्हाच तब्बल पाच किलो वजनाची होती. त्यानंतर तिचं वजन झपाट्यानं वाढत गेलं. लहानपणीही तिला उभं राहण्याऐवजी हातांवर जोर देऊन रांगतच पुढे सरकरण्याची कसरत करावी लागली. याच कारणामुळे वयाच्या अकराव्या वर्षीच तिला शाळाही सोडावी लागली. कोणतीच गोष्ट ती स्वत:च्या हातानं करू शकत नव्हती. 
वाढत्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे तिचं आयुष्य सर्वस्वी आपल्या आई आणि बहिणीवर अवलंबून होतं. त्यांच्या मदतीशिवाय ती काहीच करू शकत नाही. आजही तिची तिच परिस्थिती आहे. अर्थात मुंबईतील उपचारानंतर त्यात बराच फरक पडला आहे.
 
 
लठ्ठपणाच्या समस्येमुळेच आज 36 वर्षांची असलेली इमान गेल्या सुमारे 26 वर्षांपासून आपल्या राहत्या घरीही जाऊ शकली नाहीत. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहर हे इमानच मुळ गाव. पण लठ्ठपणाशी सामना करताना गेल्या 26 वर्षांपासून आपल्या स्वत:च्याच घरात ती जाऊ शकलेली नाही. उपचारांसाठीही ती सातत्यानं इकडेतिकडे भटकते आहे.
डॉ. लकडावाला आणि त्यांच्या टीमनं उपचार केल्यानंतर इमानच वजन तर बर्‍यापैकी कमी झालं, पुढील उपचारानंतर कदाचित आणखी कमी होईल, पण लठ्ठपणाची ही समस्या काही एकट्या इमानपुरती र्मयादित नाही. 
भारतातलेही अनेक लोक या समस्येनं त्रस्त आहेत आणि लठ्ठपणावर मात करण्यासाठी झुंजत आहेत. अर्थातच यातल्या कोणाचंच वजन इमानइतकं गलेलठ्ठ नाही, पण वाढत्या वजनामुळे होणारे तोटे आणि समस्यांनी त्यांना पुरतं घेरलं आहे.
वजन ज्या झपाट्यानं वाढतं, त्या झपाट्यानं ते उतरणार नाही, हे तर खरंच, पण प्रामाणिकपणे प्रय} केले, तर तुमचं वजनही बर्‍यापैकी कमी होऊ शकतं आणि आयुष्य सुसह्य होऊ शकतं एवढं नक्की.
त्यासाठी काय कराल?
फारसं अवघड नाही.
घरच्याघरीही हे सोप्पे उपाय तुम्ही हे करू शकाल आणि वाढलेलं वजन कमी करतानाच ते आटोक्यातही ठेऊ शकाल.
त्यासाठीचे हे दहा उपाय. करुन पाहा आणि घटवा आपलं वजन झपाट्यानं.
 
 
1- हाय प्रोटिन ब्रेकफास्ट-
ब्रेकफास्टसाठी हाय प्रोटिन्स असलेला ब्रेकफास्ट घेतल्यास तुमची ‘खा खा’ही थोडी कमी होईल आणि कॅलरीज इनटेकही घटेल.
 
2- शुगर ड्रिक्स अािण फुट्र ज्यूस शक्यतो टाळा-
आपल्या आहारातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यास वजनावरही त्याचा झपाट्यानं परिणाम होतो आणि तुमचं वजन तुम्हाला घटताना दिसेल. इन्सुलिन लेव्हल कमी होईल, भूक कमी लागेल आणि त्याचा योग्य तो परिणाम दिसू शकेल.
 
3- जेवणापूर्वी पाणी प्या-
जेवणाच्या सुमारे अर्धा तास आधी जर तुम्ही पाणी पिण्याची सवय स्वत:ला लावली, तर तीन महिन्यातच तुमचं वजन बर्‍यापैकी कमी झालेलं तुम्हाला दिसू शकेल. तब्बल 40 टक्क्यांनीही तुम्हाला ते घटलेलं दिसू शकेल.
 
4- योग्य आहार-
योग्य आहार म्हणजे काय? - तर वेट लॉस करतील अशाच आहारावर लक्ष द्या. ब्रोकोली, काकडी, कोबी, फुलकोबी, पालक. इत्यादी गोष्टींवर आहारात जास्त भर द्या. प्रत्येक जेवणात प्रोटिन्स, फॅटसचा समावेश करताना ज्यात कमी काबरेहायड्रेट्स (कर्बाेदकं) आहेत अशा अन्नघटकांचा समावेश करा. 
 
5- फायबर सप्लिमेण्टसचा वापर वाढवा-
आहारात फयबर सप्लिमेण्ट्स, म्हणजेच तंतूमय पदार्थांचा वापर वाढवल्यास वजन तर कमी होईल, पण सर्वात मुख्य फायदा म्हणजे पोटाचा घेर कमी होण्यास त्याची मदत होईल.
 
6- ‘पूर्ण’ अन्न खा-
आहारात शक्यतो पूर्ण अन्न खावे. उदाहरणार्थ फळं कापून खाण्याऐवजी अख्खे फळ खाणे उत्तम. अन्नघटक अनप्रोसेस्ड म्हणजे त्यांच्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसावी.
 
7- सावकाश आणि चावून खा-
जेवताना अन्न सावकाश आणि चावून खाल्ल्यानं पोट लवकर भरल्याची जाणीव होते आणि अधिकचं अन्न पोटात ढकलण्यापासून आपली सुटका होते.
 
8- जेवताना छोटी प्लेट घ्या-
संशोधनानी हे सिद्ध केलं आहे, की जेवताना जर आपण लहान प्लेटमध्ये अन्न वाढून घेतलं तर आपोआपच आपल्या खाण्यावरही नियंत्रण राहतं.
 
9- पुरेशी झोप घ्या-
अपुरी झोप हे वजन वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे शांत आणि पुरेशा झोपेकडे व्यवस्थित लक्ष द्या.
 
10- कॉफी आणि चहा-
तुम्ही चहा किंवा कॉफी घेत असाल तर त्यामुळेही वजन आटोक्यात राहू शकतं. पण त्याचं तारतम्य बाळगायला हवं.