शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सावधान! कोरोना झाल्यानंतर 'ही' गोष्ट केल्यास वाढतोय मृत्यूचा धोका; संशोधनातून समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 11:51 AM

CoronaVirus News & latest Updates : अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाचे शिकार झालेल्या व्यक्तीला कमीत कमी सात आठवड्यांपर्यंत थांबून मगच ऑपरेशन करायला हवं.

कोरोना व्हायरसच्या माहामारीत आता दिवसेंदिवस अधिकाधिक लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. पण यादरम्यान कोरोना संक्रमितांची धडकी भरवणारी आकडेवारी सध्या समोर येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार झालं आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एक अभ्यासातून एक धक्कादायक खुलासा करण्यात झाला आहे. यानुसार जर कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीनं सहा आठवड्याच्या आत ऑपरेशन केलं तर मृत्यूचा धोका अडीच ते तीन  पटीनं वाढू शकतो. 

अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाचे शिकार झालेल्या व्यक्तीला कमीत कमी सात आठवड्यांपर्यंत थांबून मगच ऑपरेशन करायला हवं. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एनेस्थिसियामध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. यात संशोधकांनी ऑक्टोबर २०२० दरम्यान ११६ देशात आपातकालीन सर्जरीतून जात असलेल्या ४० हजार २३१ रुग्णांवर परिक्षण केलं होतं. ज्या लोकांना ऑपरेशनच्या आधी कोरोना नव्हता आणि ऑपरेशननंतर कोरोना संक्रमणाचा सामना कारावा लागला होता. या दोन प्रकारच्या रुग्णांची तुलना करण्यात आली होती.

अध्ययनातून समोर आलेल्या माहितीनुसार ऑपरेशननंतर ३० दिवसांनंतर मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. यात असं दिसून आलं की, कोरोना व्हायरस संक्रमित नसताना ज्यांनी ३०  दिवसांच्या आत ऑपरेशन केलं  होतं त्यांच्यात मृत्यूची संभावना १.५ टक्के होती. जे लोक कोरोनानं संक्रमित होते आणि  दोन आठवड्यांच्या आत ऑपरेशन केले होते, त्यांच्यात मृत्यूची संभावना  ४ टक्के होती. तीन ते चार आठवड्यांनी ऑपरेशन करत असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूची संभावना ४  टक्के होती. पाच ते सहा आठवड्यांमध्ये ऑपरेशन करत असलेल्या रुग्णांमध्ये ३.६ टक्के आणि सात ते आठ आठवड्यांच्या आत ऑपरेशन करत असलेल्यांमध्ये मृत्यूचा धोका १.५ टक्के होते.

हे संशोधन कोणाद्वारे करण्यात आलं?

या अभ्यासात दिल्लीतील अखिल  भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच एम्सच्या ३१ डॉक्टरांनी सहभाग  घेतला होता. या अध्ययनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार सगळे वयोगट, रुग्णांची स्थिती, सर्जरी आणि आपात्कालीन स्थिती यांचा अभ्यास करण्यात आला होता. , आर्थोपेडिक्स, सर्जरी, कार्डियक एनेस्थीसिया, न्यूरोसर्जरी, न्यूरोएनेस्थेसिया आणि कार्डियोथोरेसिक रुग्णांचा यात समावेश करण्यात आला होता. Covishield Price : दुसऱ्या टप्प्यात सरकारला स्वस्त मिळाली कोरोनाची लस; जाणून घ्या लसीची किंमत आहे तरी काय

या संशोधनाचा निष्कर्ष

या  संशोधनात जास्त  आणि कमी जोखिम असलेल्या वयोगटातील लोकांवर अभ्यास करण्यात आला होता. यात असं दिसून आलं की, कोणताही व्यक्ती कोरोना व्हायरसनं संक्रमित झाल्यास  कमीत कमी सात आठवड्यांपर्यंत कोणत्याही प्रकारची सर्जरी करू नये. असं  न करता कोरोना झालेल्या व्यक्तीनं ऑपरेशन करण्याची घाई केल्यास  मृत्यूचा  धोका वाढतो. हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूResearchसंशोधनExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला