Viruddha Aahar : शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा लागतो. कारण आपण जे काही खातो त्याचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो. जर तुम्ही पौष्टिक आहार घेतला तर आरोग्य चांगलं राहील. तसंच आपलं आरोग्य कसं असेल हे आपल्या लाइफस्टाईलवरही अवलंबून असतं. वेगवेगळ्या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या आणि फळांचं सेवन केलं पाहिजे. फक्त खाऊन भागणार नाही तर तुम्ही तुमचं जेवण वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे.
अनेक गोष्टी अशा असतात ज्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. पण तुम्ही जेव्हा दोन विरूद्ध पदार्थ एकत्र खाता तेव्हा त्यांचे पोषक तत्व कमी होतात आणि याने आरोग्यालाही नुकसान होतं. आयुर्वेदाच्या भाषेत याला विरूद्ध आहार असं म्हटलं जातं. हा विरूद्ध आहार शरीराचं आतून नुकसान करतो.
विरूद्ध आहार म्हणजे काय?
काही लोक आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहाराची खूप काळजी घेतात. पण काही लोक कशाचाही विचार न करता काहीही खातात आणि कशासोबतही खातात. जे त्यांना चांगलंच महागात पडतं. असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यांचे गुणधर्म एकसारखे नसतात. अशात हे पदार्थ जर सोबत खाल्ले गेले तर तुम्ही आजारी पडू शकता. जर तुम्ही नेहमीच विरूद्ध आहार घेत असाल तर तुम्हाला गंभीर आजारांचाही धोका वाढतो.
विरूद्ध आहाराने होणाऱ्या समस्या
जर तुम्ही अनेक वर्षांपासून विरूद्ध आहार घेत असाल तर याचा प्रभाव तुम्हाला लगेच दिसेल असंही नाही. पण जेव्हा कधी याचा प्रभाव तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. कारण असं केल्याने तुम्हाला पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या, डायजेशनसंबंधी समस्या इन्फर्टिलिटी, जॉईंट्समध्ये वेदना, त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. तसेच असिडिटी, फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो, ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. असतो.
आयुर्वेदात आहाराचे नियम
आयुर्वेदनुसार, खाण्यात सगळेच ६ रस असायला हवेत जसे की, गोड, चटपटीत, आंबट, तिखट, तुरट आणि कडू. त्याशिवाय आयुर्वेदात असंही सांगण्यात आलं आहे की, शरीराच्या प्रकृतीनुसारच व्यक्तीने जेवण केलं पाहिजे. जेणेकरून शरीरात पोषक तत्व संतुलित राहतील.
विरूद्ध आहाराची काही उदाहरणे
दूध आणि गूळ
मध आणि गरम पाणी
पचायला वेळ लागणारं जेवण आणि गोड
केळी, दूध आणि दही रात्री खाणे
दही गरम करून काही बनवने
भाजीमध्ये घरी बनवलेली मलाई किंवा बाजारातील क्रीम टाकू नये
तळलेले बटाटे
मीठ आणि मासे दुधासोबत खाऊ नका
कोशिंबीर आणि खीर सोबत खाऊ नये
काकडी आणि दही
गरम चहा किंवा कॉफीच्या सेवनानंतर थंड पाणी पिऊ नये
उडीद डाळीसोबत मूळा खाऊ नये