जर तुम्हाला नेहमीच निरोगी आणि फीट रहायचं असेल तर आयुर्वेदाला आपला मित्र बनवा. आयुर्वेदात घरातीलच वस्तूंचा वापर करून अनेक आजार दूर केले जाऊ शकतात. हे उपाय आजारांना दूर करण्यास मदत करतात आणि इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. जर तुम्हाला सतत थकवा किंवा कमजोरी वाटत असेल तर एक उपाय करू शकता.
आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रॉबिन शर्मा यांनी एक खास उपाय सांगितला आहे ज्याने केवळ 41 दिवसांमध्ये 80 प्रकारचे वात रोग दूर केले जाऊ शकतात. याने कमजोरी आणि वेदना यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. सोबतच पुरूषांची शक्तीही वाढते.
घरीच तयार करा औषध
लसणांच्या काही कळ्यांचे छोटे छोटे तुकडे करा. ते जरा दाबून घ्या. नंतर त्यांवर इतकं मध टाका ज्यात ते बुडतील. या मिश्रणावर थोडा आल्याचा रस टाका आणि थोड्या वेळाने सेवन करा.
लसूण खाण्याचे आयुर्वेदिक फायदे
लसणामुळे अनेक गंभीर आजारांना दूर केलं जाऊ शकतं. लसूण वाताची समस्या दूर करतो. शारीरिक शक्ती वाढवतो. तसेच पुरूषांची शारीरिक क्षमताही वाढवतो. पुरूषांची विर्याची गुणवत्ताही वाढवतो. हृदयसाठी घातक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतो. वेगवेगळ्या हृदयारोगांपासूनही बचाव केला जातो.
मध आणि आल्याच्या रसाचे फायदे
आयुर्वेदिक एक्सपर्टनुसार, मध कोणत्याही गोष्टीत मिक्स केलं तर त्याचे फायदे वाढतात. तेच आल्यामध्ये अँटी-इन्फ्लामेटरी आणि अँटी- मायक्रोबियल तत्व असतात. हे उपाय रिकाम्या पोटी करा आणि सुरूवातीला कमी प्रमाणात याचं सेवन करा. नंतर हळूहळू याचं प्रमाण वाढवू शकता.