Health Tips : जेवणासोबत कोशिंबिर खाल्ल्याने जेवणाची टेस्ट दुप्पट होते. दह्यात बनवलेला सलाद म्हणजे कोशिंबिर भात, बिर्याणी, पराठे, चपाती आणि इतरही काही पदार्थांसोबत खाल्ला जातो. सलादमुळे केवळ टेस्टच बदलते असं नाही तर शरीरही स्वच्छ होतं. आतड्यांचं आरोग्य सुधारतं, पचन चांगलं होतं, वजन कमी होतं आणि ब्लड शुगर व ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.
रायता म्हणजे कोशिंबिर बनवण्यासाठी लोक जिरं, काळं मीठ, बुंदी, काकडी, गाजर, रताळे आणि हिरव्या मिरच्यांचा वापर करतात. याने टेस्ट आणखी चांगली होते. यात काहीच शंका नाही की, रायत्यामध्ये म्हणजे कोशिंबिरीमध्ये भाजी टाकली तर पोषण आणखी वाढतं. अशीच एक भाजी आहे जी कोशिंबिरीमध्ये टाकली तर कोशिंबिरीतील सगळे पोषक तत्व नष्ट होतात. ती म्हणजे कांदा.
एक्स्पर्टनुसार, बरेच लोक कोशिंबिरीमध्ये कांदा टाकतात. पण कोशिंबिरीत कांदा टाकला तर हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊ ते कसं....
दही आणि कांद्याचं कॉम्बिनेशन घातक
आयुर्वेदानुसार, दही आणि कांद्याला विरूद्ध अन्न मानलं जातं. म्हणजे दही थंड असतं आणि कांदा उष्ण असतो. जेव्हा हे दोन्ही एकत्र होतात तेव्हा शरीरात वात, पित्त आणि कफ या समस्या निर्माण होतात.
दही कांद्यासोबत खाण्याचे नुकसान
डॉक्टरांनी सांगितलं की, हे कॉम्बिनेशन शरीरात दोष वाढतात. यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. ज्यात सगळ्यात कॉमन आहेत अपचन, अॅसिडिटी, सूज आणि पोटासंबंधी समस्या.
शरीरात वाढते उष्णता
डॉक्टरांचं मत आहे की,हे कॉम्बिनेशन शरीरात जास्त उष्णता निर्माण करतं आणि यामुळे विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे स्किन अॅलर्जी आणि रिअॅक्शन होऊ शकतात. ज्यात रॅशेज, एक्जिमा आणि सोरायसिस यांचा समावेश आहे.
फूड पॉयजनिंगचा धोका
डॉक्टरांनी सांगितलं की, यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधी गंभीर समस्या होऊ शकतात. तसेच तुम्हाला फूड पॉयजनिंगचा धोकाही होऊ शकतो. असं झालं तर तुम्हाला मळमळ, उलटी, शरीरात पाण्याची कमतरता अशा समस्या होतात.
दह्यात कांदा मिक्स करण्याची योग्य पद्धत
कांद्यामध्ये सल्फ्यूरिक तत्व असतात आणि तो कच्चा खाल्ल्याने तुमच्या टाळूमध्ये उष्णता निर्माण होते. जर तुम्ही कांदा भाजल्यानंतर दह्यात टाकाल तर याचा इफेक्ट कमी होतो. कांदा भाजल्यानंतर त्याची सल्फर लेव्हलही कमी होते. कांदा गरम केल्यावर किंवा भाजल्यावर त्यातील पोषक तत्व कमी होत नाहीत. फक्त ते थोडे कमी होतील.