Drumstick Benefits : शेवग्याच्या शेंगांची भाजी भरपूर लोक आवडीने खातात. या शेंगा वेगवेगळ्या पदार्थांमध्येही वापरल्या जातात. या खायला टेस्टी तर लागतातच सोबतच या शेंगांचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना आणि शेवग्याच्या पानांना फार महत्व आहे. आयुर्वेदानुसार, शेवग्याच्या शेंगा आणि पाने ३०० पेक्षा जास्त आजारांवर रामबाण उपाय ठरतात. अशात आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचे फायदे सांगणार आहोत.
जास्तीत जास्त लोक प्रोटीन मिळवण्यासाठी मांस, अंडी आणि दुधाचं सेवन करतात पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या गोष्टींपेक्षाही जास्त प्रोटीन तुम्हाला या भाजीतून मिळू शकतं. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमीनो अॅसिड, बीटा कॅरेटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम, कार्बोहाइड्रेट, फॉस्फोरस, जिंकसारखे मिनरल्स आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात. तसेच या शेंगांमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B१, व्हिटॅमिन-B२, व्हिटॅमिन-B३, व्हिटॅमिन-B४, व्हिटॅमिन-B६, व्हिटॅमिन-B९ आणि व्हिटॅमिन-C भरपूर असतात. या शेंगांचं सेवन केल्यावर शरीराला काय फायदे मिळतात जे जाणून घेऊ.
हाय ब्लड प्रेशर
आजकाल बऱ्याच लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या असते. अशात ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे अशा लोकांनी शेवग्याच्या शेंगाची भाजी खाणं फायदेशीर ठरतं.
तरूण दिसाल
शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. ज्याचा वापर पूर्वीपासून सौदर्यासाठी केला जातो. जर तुम्ही या शेवग्याच्या शेंगाचा आहारात नियमित समावेश कराल तर तुमच्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसणार नाही.
हाडं आणि दात मजबूत
शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. ज्याने तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत मिळते. तसेच दातही मजबूत होतात. म्हणूनच लहान मुलांना या शेंगांची भाजी देणं फायदेशीर मानलं जातं.
लठ्ठपणा कमी करा
लठ्ठपणा आणि शरीराची वाढलेली चरबी दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा एक फायदेशीर उपाय मानला जातो. यात फॉस्फोरस भरपूर प्रमाणात आढळतं जे शरीरातील अतिरिक्त कॅलर कमी करतं आणि सोबतच चरबी कमी करून तुमचा लठ्ठपणाही दूर करतं.
रक्त शुद्ध होतं
शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्ये देखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अॅंटी-बायोटीक एजंट म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील विषारी पदार्थ वाढल्याने होणारा अॅक्नेचा त्रास, त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.
शुगर नियंत्रणात ठेवा
शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासही शेंग़ा फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारतं.
श्वासासंबंधी समस्या दूर कार
कफ, श्वास घेताना त्रास होणे अशा समस्या असतील तर शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यावे. यामधील तत्व श्वसनमार्गातील टॉक्सिक तत्व कमी करण्यास मदत करतात. अस्थमा यासारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा उत्तम नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात.
इन्फेक्शनपासून बचाव
शेवग्याच्या पाना, फूलांमध्ये अॅंटी-बॅक्टेरियल तत्व असतात. यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून तुमचा बचाव होतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटामिन सी भरपूर असतं. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यासही शेवग्याच्या शेंग़ा फायदेशीर ठरतात.