Health Tips : जिभेचा रंग आरोग्यासंबंधी अनेक खुलासे करतो. जिभेच्या रंगावरून तुम्ही हेही जाणून घेऊ शकता की, तुमच्या शरीरात कोणतं 'विष' पसरलं आहे. शरीरात असलेले विषारी पदार्थ आरोग्याचे दुश्मन असतात आणि ते कोणत्याही विषासारखेच नुकसानकारक असतात. हेच विषारी पदार्थ अनेक आजारांचं कारण ठरतात.
विषाक्त पदार्थ कसे तयार होतात? जेव्हा शरीरात अन्न पचन होतं, तेव्हा त्यासोबत काही विषारी पदार्थ निघतात. हे तत्व सामान्यपणे बेकार आणि नुकसानकारक असतात. ज्यांना साफ करण्याचं काम लिव्हर, किडनीसारखे अवयव करतात. पण अनेकदा हे विषारी पदार्थ शरीरात चिकटून राहतात. ज्यामुळे अनेक आजार होतात.
जिभेच्या रंगावरून ओळखा धोका
डायटिशिअन मनप्रीत यांच्यानुसार, जिभेच्या रंगावरून शरीरात असलेल्या विषारी पदार्थांबाबत जाणून घेता येऊ शकतं.
जिभेचा रंग पांढरा झाला असेल तर...
- कफ असंतुलित झाल्यामुळे म्यूकस जमा होणे.
जिभेचा रंग पिवळा-हिरवा झाला तर...
- हे पित्त असंतुलित होण्याचं लक्षण
जिभेचा रंग काळा-भुरका झाला तर...
- हे वाताशी संबंधित लक्षण आहे.
जिभेचा रंग पांढरा-पिवळा झाला तर...
- हे रक्तात धातुची कमतरता असल्याचं लक्षण आहे.
यापासून बचावासाठी काय उपाय आहेत?
डायटिशिअन मनप्रीतनुसार, जिभेचा बदललेला रंग शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्याचं लक्षण असतं. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी रोज जीभ घासून स्वच्छ करावी. जीभ स्वच्छ करण्यासाठी एक्सपर्ट तांब्याचं स्क्रपर वापरण्याचा सल्ला देतात. कारण त्यात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात.
पचन तंत्राला फायदे
जीभ घासून स्वच्छ केल्याने जिभेवर जमा म्यूकस निघून जातो. हा म्यूकस जिभेवर असलेल्या रिसेप्टर्सला ब्लॉक करतो. जे पचन चांगलं होण्यासाठी गरजेचं असतं.
श्वासांची दुर्गंधी होते दूर
जीभ घासून स्वच्छ केल्याने तोंडातील बॅक्टेरियापासून सुटका मिळवता येतो. हे नुकसानकारक बॅक्टेरिया ओरल हायजीनला बिघडवण्यासाठी, दात किडण्यासाठी आणि श्वासांच्या दुर्गंधीचं कारण ठरतात.
इम्यूनिटी वाढते
तोंडात जमा होणारे बॅक्टेरिया इम्यून सिस्टीमचं नुकसान करतात. हे विषाक्त पदार्थ दूर करण्यासाठी टंग स्क्रैपिंग मदत करतं. याने इम्यून सिस्टीम मजबूत राहतं.
चांगल्याप्रकारे काम करतात अवयव
रोज जीभ घासून स्वच्छ केल्याने अवयव अॅक्टिव होतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. या चांगल्या सवयीने जिभेवरून डेड सेल्स, टॉक्सिन दूर होऊन टेस्ट बडचं कार्य वाढतं.