भारतात चहाचं सगळ्यात जास्त सेवन केलं जातं. जास्तीत जास्त लोक दिवसाची सुरूवातच चहाने करतात. कधी कधी चहा जास्त प्यायल्याने आरोग्याला नुकसान होतं. हिवाळ्यात तर चहाचं फार जास्त सेवन केलं जातं. असं करणं अनेक दृष्टीने नुकसानकारक ठरू शकतं आणि अनेक हॉर्मोन बिघडतात.
हिवाळ्यात चहाचं जास्त सेवन करू नये. कारण याने शरीराला आराम तर मिळतो, पण कॅफीनही जास्त जातं. डायटिशिअन मनप्रीत कालरा यांच्यानुसार, जास्त कॅफीन घेतल्याने 5 हॉर्मोनचं बॅलल्स खराब होतं. हे तुमच्या अवयवांचं काम कंट्रोल करण्यास मदत करतात.
अशात काही हेल्दी चहा आणि ड्रिंक्सबाबत मनप्रीत कालरा यांनी माहिती दिली. याने हॉर्मोन्सचं बॅलन्स कायम राहतं आणि सोबतच शरीरातील विषारी पदार्थही बाहेर निघण्यास मदत मिळते.
जास्त कॅफीनमुळे बिघडतात हे 5 हॉर्मोन
- कोर्टिसोल वाढल्याने एड्रेनल फटीग आणि स्ट्रेस वाढू शकतो.- एस्ट्रोजन वाढल्याने कंबर आणि हिप्सवर चरबी चढते आणि मासिक पाळीसंबंधी समस्या होते.
- इन्सुलिन सेंसिटिविटी कमी झाल्याने शुगर वाढू शकते आणि डायबिटीस होतो.
- मेलाटोनिनचं उत्पादन कमी झाल्याने झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
- थायराइड हॉर्मोनचं मेटाबॉलिज्म खराब होऊ शकतं. ज्यामुळे टी3 आणि टी4 चं बॅलन्स बिघडतं.
खास चहा आणि ड्रिंक्स
1) ग्रीन टी आणि कॅमोमोमाइल टी
ग्रीन टी चं सेवन केल्याने अॅंटी-ऑक्सिडेंट आणि कॅटेचिन मिळतात जे सगळ्या हॉर्मोनमध्ये संतुलन ठेवतात. तेच कॅमोमाइल टी एक हर्बल टी आहे ज्यामुळे तणाव कमी करण्यास मदत मिळते. तसेच याने झोप न येण्याची समस्याही दूर होते.
2) स्पियरमिंट टी आणि आल्याचा चहा
नुसता साधा चहा पिण्याऐवजी आल्याचा चहा प्यावा. यात दूध किंवा चहा पावडर नसते. आल्याच्या चहाने तुमचं पचन वाढतं आणि पोटासंबंधी समस्या दूर होतात. स्पियरमिंट हर्बल टी प्यायल्याने एंड्रोजन आणि टेस्टोस्टेरोन मेल हॉर्मोन कमी होतात आणि पिंपल्सही दूर होतात.
3) हळद टाकलेलं दूध
चहाला सगळ्यात चांगला पर्याय हळदीचं दूध आहे. याने तुम्हाला उष्णतेसोबतच अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणही मिळतात. ज्यामुळे वेदना, सूज आणि इन्फेक्शन दूर होतं. याच्या करम्यूमिनचं अवशोषण वाढवण्ासाठी नेहमीच थोडं काळे मिरे पावडरही त्याला टाका.