तेल- तूप आपल्या भारतीय पदार्थांमध्ये हमखास वापरलं जातं. यामुळे टेस्ट वाढते. पण यांच्या जास्त सेवनाने अनेक गंभीर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या जेवणातील तेल कमी करायचं असेल तर FSSAI द्वारे सांगण्यात आलेले हे उपाय केले पाहिजे.
भारतीय पदार्थांमध्ये तेल, तूप, लोणी यांचा अधिक वापर केला जाता. FSSAI नुसार, या गोष्टी शरीरासाठी गरजेच्या आहेत, पण याचं सेवन जास्त केलं तर लठ्ठपणासहीत अनेक गंभीर आजार होण्याचा धोकाही असतो.
हाय बीपी आणि डायबिटीसचा धोका
FSSAI ने सांगितलं की, जास्त तेलामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग होण्याचा सगळ्यात जास्त धोका राहतो.
आजारांपासून बचावाचे उपाय
असा आहार घ्या ज्यात 20 ते 25 टक्के कॅलरी, फॅट किंवा तेलातून आल्या पाहिजे. एकाचवेळी खूप जास्त तेल, तूप खरेदी करू नका.
जेवणातून तेल कमी करा
किचनमध्ये तेल डब्यामध्ये खूप जास्त भरून ठेवू नका. रोज किती तेलाचा वापर करत आहात यावरही लक्ष द्या. रोज जेवणातून हळूहळू तेलाचं प्रमाण कमी करा.
छोट्या चमच्याने टाका तेल
जेवण बनवताना तेल बॉटलने किंवा मोठ्या चमच्याने टाकण्याऐवजी छोट्या चमच्याने टाका. तळलेले पदार्थ जास्त खाण्याऐवजी उकडलेले पदार्थ अधिक खा. हे उपाय केले तर तुमचा अनेक गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो.