Best Cooking Oil : तेल शरीरासाठी खूप महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. तेलाने शरीराल ऊर्जा मिळते, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स अब्जॉर्ब करण्यासही मदत मिळते. शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी सुद्धा तेलाची मदत मिळते. तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही तेलाने मदत मिळते.
पण काही तेल हे आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. या नुकसानकारक तेलाच्या वापराने लठ्ठपणा, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल वाढणं, पचनासंबंधी समस्या जसे की, अपचन, जुलाब इत्यादी समस्या होतात. हेच कारण आहे की, तुम्हाला माहीत असावं की, जेवण बनवण्यासाठी कोणतं तेल वापरावं आणि किती वापरावं.
भारतात खाद्यपदार्थांच्या गोष्टींच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी संस्था एफएसएसआयने सांगितलं आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कोणतं तेल वापरावं आणि किती वापरावं.
तेलांचा बदलून वापर करा
वेगवेगळे तेल वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी अॅसिड देतात. जे शरीराच्या वेगवेगळ्या कामासाठी गरजेचे असतात. तेलाचे चांगले फायदे मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या तेलांचा वापर केला पाहिजे.
उदाहरण द्यायचं तर तुम्ही जर पोहे बनवत असाल तर तिळाच्या तेलाचा वापर केला पाहिजे, डाळीला तूपाचा तडका दिला पाहिजे. रात्री भाजी बनवण्यासाठी तुम्ही सनफ्लॉवर तेलाचा वापर केला पाहिजे.
जेवण बनवण्यासाठी चांगलं तेल कोणतं?
FSSAI नुसार, जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही भाजी बनवण्यासाठी सनफ्लॉवर, राईस ब्रान तेलांचा वापर करू शकता. जर तुम्ही रोज तेल बदलू शकत नसाल तर एफएसएसएआयने सल्ला की, तुम्ही तेल दर महिन्यात बदला. तेल वापरण्याच्या योग्य पद्धतीने हृदय आणि शरीर निरोगी राहतं. तसेच तेलाचा वापर कमी करावा.
या गोष्टींची घ्या काळजी
ऑलिव्ह आईल, सोयाबीन तेल, फल्ली तेल आणि सनफ्लॉवर तेल हे आरोग्यासाठी चांगले असतात. खोबऱ्याचं तेल आणि पाम ऑइलचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे.