हार्ट अटॅक (Heart Attack) आजकाल मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण ठरत आहे. लोकांनुसार, हार्ट अटॅक अचानक घडणारी घटना आहे. पण हार्ट अटॅक येण्याआधी काही लक्षणं दिसतात आणि काही संकेत मिळतात. ज्यांकडे लोक दुर्लक्ष करतात. नुकताच 500 पेक्षा जास्त महिलांवर एक रिसर्च करण्यात आला. ज्यानुसार हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिन्याआधीच शरीर काही संकेत देणं सुरू करतं.
जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिन्याआधी याची काही लक्षणं दिसू लागतात. रिसर्चमध्ये 500 पेक्षा जास्त महिलांचा समावेश करण्यात आला होता. एकूण सहभागी महिलांपैकी 95 टक्के महिलांनी सांगितलं की, त्यांना हार्ट अटॅक येण्याच्या एक महिनाआधीपासूनच शरीरात काही लक्षणं दिसू लागले होते. 71 टक्के महिलांनी थकव्याला एक सामान्य लक्षण सांगितलं. तेच 48 टक्के म्हणाल्या की, त्यांना झोपेशी संबंधित समस्या झाली. काही महिलांच्या छातीत वेदना झाली, छातीवर दबाव पडला, वेदना किंवा आखडेपणा जाणवला.
हार्ट अटॅकची लक्षण
थकवा
झोपेची समस्या
आंबट ढेकर
चिंता
हृदयाचे ठोके वाढणे
हातांमध्ये कमजोरी
विचार करण्यात बदल
दृष्टीमध्ये बदल
भूक कमी लागणे
हात-पायांमध्ये झिणझिण्या
रात्री श्वास घेण्यास समस्या
ही आहेत हार्ट अटॅकची कॉमन कारणे
लठ्ठपणा
डायबिटीस
हाय कोलेस्ट्रॉल
हाय बीपी
धूम्रपान आणि दारूचं जास्त सेवन
हाय फॅट डायट
हृदय सेफ ठेवण्यासाठी एक हेल्दी, संतुलित आहार घ्या आणि प्रोसेस्ड, शुगर असलेल्या पदार्थांच सेवन कमी करा. सोबतच नियमितपणे व्यायाम करा. वजन कंट्रोलमध्ये ठेवा. कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा. दारूचं सेवन, सिगारेट सोडा.