ब्लड प्रेशर वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. बऱ्याच लोकांचं जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं तेव्हा त्यांनी हलकी किंवा जास्त डोकेदुखी होते, तणाव, श्वास घेण्याची समस्या, थकवा किंवा कमजोरी यांसारखी लक्षण दिसू लागतात. पण बऱ्याच लोकांना हाय बीपीची लक्षणं जाणवतही नाहीत. याच कारणामुळे हाय बीपीला सायलेंट किलर म्हणून मानलं जातं.
काय आहे हाय ब्लड प्रेशरचं कारण?
जर तुम्हाला वरील लक्षणं न दिसता हाय बीपीची समस्या राहत असेल तर हेही फार घातक ठरतं. जर बीपी वाढण्याबाबत सांगायचं तर फार जास्त ऑयली, जंक फूड्स, दारूचं सेवन, स्मोकिंग आणि स्ट्रेसमुळे ही समस्या वाढते. न्यूट्रिशनिस्ट आणि डाएट एक्सपर्ट सिमरत कथूरिया यांनी हाय बीपीवर तुम्हाला काही घरगुती उपाय सांगितले आहेत.
साहित्य
1 कप कलिंगड
1/2 कप बीट
1/2 कप पाणी
1/2 लिंबाचा रस
कसा तयार कराल कलिंगड आणि बिटाचा ज्यूस
लिंबू सोडून सगळ्या गोष्टी एका ज्यूसरमध्ये टाकून ज्यूस काढा. ज्यूस गाळून एका काचेच्या ग्लासात काढा. यात फायबर वाढवण्यासाठी मिश्रणातील शिल्लक राहिलेलं मटेरिअल मिक्स करा. शेवटी लिंबाचा रस टाका आणि सेवन करा.
बीपी कसा होईल कंट्रोल?
कलिंगडामध्ये सिट्रूलाइन तत्व असतं जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं.
तर बिटामध्ये नायट्रेट भरपूर असतं. जे शरीरात नायट्रिक ऑक्साइडमध्ये बदलतं. याने रक्तवाहिन्या खुलतात आणि ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी होते.
लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. तसेच याने हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासही मदत मिळते.
या गोष्टींची घ्या काळजी
हे नेहमीच लक्षात ठेवा की, या उपायासोबतच तुम्हाला हेल्दी डाएटही घ्यायची आहे आणि हेल्दी लाइफस्टाईलही फॉलो करायची आहे. त्याशिवाय कोणताही घरगुती उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.