कोरोनाकाळातील वाढत्या प्रदूषणात आरोग्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. प्रदूषणाचा सगळ्यात जास्त परिणाम फुफ्फुसांवर होत असतो. फुफ्फुसांमधील घाण बाहेर न निघता अशीच साचत गेली तर महागात पडू शकतं. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, बोलायला त्रास होणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्याचे काही उपाय सांगणार आहोत.
डायटिशिनय आणि न्युट्रिशियन भाग्यश्री या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमीच त्वचेबाबत वेगवेगळे उपाय सांगत असतात. फुफ्फुसांच्या समस्येमुळे टीबी, कॅन्सर, निमोनिया असे आजार उद्भवू शकतात. फुफ्फुसांना चांगले ठेवण्यासाठी डायटिशियन भाग्यश्री यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. मग जाणून घेऊया कोणत्या उपायांच्या वापराने फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण तुम्ही सहज काढून टाकू शकता.
भाग्यश्री यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी यात लिहीले आहे की, धुम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूच नेहमी फुफ्फुसांची काळजी घेणं आवश्यक आहे. दोन मिरच्यांसह एक लहान चमचा जीरं घेऊन पाण्यात एक उकळ काढून घ्या. उकळ्यानंतर गरम चहाप्रमाणे या चहाचे सेवन करा. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. या पाण्यामुळे छातीत जमा झालेले कफ कमी होण्यासाठी मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेट राहते.
फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी व्हिटामीन सी, व्हिटामीन ई किंवा बीटा कॅरोटीन असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यात मोठ्या प्रमाणावर एंटी ऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे फुफ्फुसं निरोगी राहण्यास मदत होते. घरात झाडं असल्यास हवा खेळती आणि स्वच्छ राहण्यास मदत होते. म्हणून घरात स्पायडर प्लांट्स, मनी प्लांट्स, एलोवेरा, बोस्टन फर्न्स, तुळस अशी झाडं असायला हवीत. श्वसनासाठी परिणाकारक ठरणारे व्यायाम करायला हवेत. या व्यायाम प्रकारात तुम्हाला श्वसन यंत्रणेवर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्त पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल.
पॉझिटिव्ह बातमी! ६ कोटी लोकांना लवकरच कोरोनाची लस मिळणार; पुण्याच्या सिरमनं तयार केली लस
सगळ्यात आधी ४ सेकंदापर्यंत श्वास रोखून धरा. जेणेकरून फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचेल. मग ४ सेकंदांनी श्वास सोडून द्या. त्यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो. कार्डियो एक्सरसाईज फुफ्फुसांसाठी देखील फायदेशीर असतं. यात साधे सोपे व्यायाम प्रकार असतात. चालणे, एकाच जागी उभं राहून उड्या मारणे, जंपिंग जॅक, चालणे, सायकलिंगचा यात समावेश असतो. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
खुशखबर! कोरोनाला नष्ट करण्याासाठी प्रभावी ठरणार mRNA-1273 लस; जाणून घ्या कारण
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त पाणी प्या. पाण्याचे सेवन केल्यानं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. याशिवाय आहारही चांगला घ्यायला हवा जेणेकरून फुफ्फुसांना पोषण मिळेल, मादक पदार्थाचं सेवन करू नका. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला आजाराचं शिकार व्हायला लागू शकतं. त्यामुळे संतुलित आहार घ्या. व्हिटामीन सी असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करा.